मराठवाड्यातील अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून साधला संवाद


राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाला तातडीने मदत पुरवण्याचे, पुराच्या वेढ्यात अडकलेल्या नागरिकांची त्वरित सुटका करण्याचे निर्देश


ठाणे : मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष ठेवून असून, मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या नागरिकांना तातडीने मदत करून सुरक्षितस्थळी हलविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तसेच उपमुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव व संचालकांशी बोलून त्यांना सूचनाही दिल्या.


मराठवाड्यात सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेऊन लोकांना तत्काळ मदत पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला.


दरमान धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील ढगपिंपरी गावातील नागरिक पूर परिस्थितीत अडकल्याचे त्यांना समजले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांशी बोलून तत्काळ एनडीआरएफच्या मदतीने हेलिकॉप्टर पाठवून पुराच्या वेढ्यात अडकलेल्या नागरिकांना तातडीने एअरलिफ्ट करून सुरक्षितस्थळी नेण्याचे निर्देश दिले. तसेच कोणतीही मदत लागल्यास तत्काळ आपल्याशी संपर्क साधावा आणि वेळोवेळी पूर परिस्थितीची माहिती आपल्याला द्यावी असेही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.

Comments
Add Comment

दादरच्या 'स्टार मॉल'मध्ये भयंकर आग!

सेनाभवनसमोर असलेल्या मॉलमध्ये मॅकडोनाल्ड्सच्या किचनमध्ये आग! मुंबई : दादर पश्चिम येथील गजबजलेल्या स्टार

होंडाने EICMA २०२५ मध्ये त्यांची पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल Honda WN7 लाँच केली

मुंबई / मिलान: होंडाने त्यांची पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल Honda WN7 प्रथमच बाजारात लाँच केली आहे. मिलान, इटली येथे

जसप्रीत बुमराहचा पराक्रम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्वीन्सलँडच्या कॅरारा ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-२०

अभिनेता पुष्कर जोग दुबईला होणार स्थायिक! मुलीच्या भविष्यासाठी घेतला भारत सोडण्याचा निर्णय

मुंबई: दुबई हे सध्या अनेक भारतीयांच्या पर्यटनाचे आकर्षण ठरले आहे. त्यात भारतीय कलाकार केवळ सुट्ट्यांसाठी नव्हे,

कल्याणमधील रिंगरोड प्रकल्प लवकर होणार पूर्ण! आयुक्तांचे आश्वासन

कल्याण: शहरातील वाहतूककोंडीवर पर्याय म्हणून कल्याणमध्ये रिंगरोड तयार करण्यात येत आहे. या प्रस्तावित रिंगरोडचे

रश्मीका आणि विजय देवरकोंडा लवकरच लग्नबंधनात अडकणार

मुंबई : छावा चित्रपटात राणी येसूबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि सुपरस्टार विजय देवरकोंडा