मुंब्रामध्ये कंटेनरची दुचाकीला धडक, तीन मुलांचा जागीच मृत्यू

ठाणे : मुंब्रामध्ये भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या ३ मुलांना कंटेनरने चिरडल्याने तिन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला. मुंब्रामधील गावदेवी बायपासजवळ ही अपघाताची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रामध्ये आज दुपारच्या सुमारास भयंकर अपघात झाला. गावदेवी बायपास परिसरात ३ मुलांना कंटेनरने चिरडलं. दुचाकीवरून ही तिन्ही मुलं चालले होते. त्यावेळी कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. कंटेनरच्या चाकाखाली येऊन या तिन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला. तिघांच्या मृतदेहांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.

या अपघाताची माहिती मिळताच फायरब्रिगेड, रुग्णवाहिका आणि मुंब्रा पोलिसांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तिन्ही मुलं कामासाठी दुचाकीवरून ठाण्यातून शिळफाटा येथे जात होते त्याचवेळी ही भयंकर घटना घडली. मुंब्रा पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी दाखल होत मोठी गर्दी केली होती . त्यामुळे काही काळ घटनास्थळावर तणावाचे वातावरण होते. मुंब्रा बायपासवर नेहमी अशा प्रकारचे अपघात होत असतात. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Comments
Add Comment

यंदा राज्यात दहा ठिकाणी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने यंदा राज्यात दहा ठिकाणी

‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ विशेष तपासणी अभियानांतर्गत राज्यात ३ हजार ४८५ अन्न आस्थापनांची तपासणी

मुंबई: अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत राज्यात ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ हे विशेष तपासणी

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अनाथ मुलांसोबत साजरी केली दिवाळी

मुंबई : दिवाळीचा सण म्हणजे फक्त दिव्यांचा, फटाक्यांचा किंवा सजावटीचा उत्सव नाही तर तो माणुसकीचा, प्रेमाचा आणि

Vittal Mandir : वारकऱ्यांचा संताप अनावर! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीत 'चिकन मसाला'; बीव्हीजी कंपनी अडचणीत

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कर्मचाऱ्यांना देण्यात

Govind Barge Death : माजी उपसरपंच बर्गे मृत्यू प्रकरणात मोठी बातमी, नर्तिका पूजा गायकवाडच्या अडचणी वाढल्या; यंदाची दिवाळीही...

बीड : बीडमधील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात एकच

Chandshaili Ghat Accident : नंदुरबारच्या चांदशैली घाटात भीषण अपघात; भाविकांची पीकअप जीप दरीत कोसळून ६ ठार, १५ हून अधिक गंभीर जखमी

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात आज सकाळी एक हृदयद्रावक आणि भीषण अपघात घडला आहे. भगवान अस्तंबा ऋषी यांच्या