Monday, September 22, 2025

मुंब्रामध्ये कंटेनरची दुचाकीला धडक, तीन मुलांचा जागीच मृत्यू

मुंब्रामध्ये कंटेनरची दुचाकीला धडक, तीन मुलांचा जागीच मृत्यू

ठाणे : मुंब्रामध्ये भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या ३ मुलांना कंटेनरने चिरडल्याने तिन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला. मुंब्रामधील गावदेवी बायपासजवळ ही अपघाताची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रामध्ये आज दुपारच्या सुमारास भयंकर अपघात झाला. गावदेवी बायपास परिसरात ३ मुलांना कंटेनरने चिरडलं. दुचाकीवरून ही तिन्ही मुलं चालले होते. त्यावेळी कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. कंटेनरच्या चाकाखाली येऊन या तिन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला. तिघांच्या मृतदेहांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. या अपघाताची माहिती मिळताच फायरब्रिगेड, रुग्णवाहिका आणि मुंब्रा पोलिसांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तिन्ही मुलं कामासाठी दुचाकीवरून ठाण्यातून शिळफाटा येथे जात होते त्याचवेळी ही भयंकर घटना घडली. मुंब्रा पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी दाखल होत मोठी गर्दी केली होती . त्यामुळे काही काळ घटनास्थळावर तणावाचे वातावरण होते. मुंब्रा बायपासवर नेहमी अशा प्रकारचे अपघात होत असतात. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Comments
Add Comment