सुपर संडे, थोड्याच वेळात सुरू होणार भारत - पाकिस्तान सामना; कोण खेळणार ?


दुबई : आशिया कप २०२५ स्पर्धेतील सुपर फोर फेरीतील भारत - पाकिस्तान हा टी २० सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे हा सामना रंगणार आहे.


सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा पाकिस्तानचा सामना करण्यास सज्ज झाला आहे. दोन्ही देश आठवड्याभरात पुन्हा आमनेसामने येत आहेत. याआधी आशिया कपच्या साखळी फेरीत झालेल्या पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारतीय क्रिकेटपटूंनी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता.


पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी भारतात पहलगाम येथे हल्ला करुन निष्पाप पर्यटकांची क्रूरपणे हत्या केली होती. या घटनेचा निषेध म्हणून पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करणार नसल्याची भूमिका भारतीय क्रिकेटपटूंनी घेतली. आशिया कप ही बहुराष्ट्रीय स्पर्धा आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नियम पाळणे आवश्यक असल्यामुळे भारत पाकिस्तान विरुद्ध खेळेल पण पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना हस्तांदोलन करणार नाही, अशी भूमिका भारतीय खेळाडूंनी घेतली. भारतीय क्रिकेटपटूंच्या या भूमिकेला भारतीय क्रिकेटप्रेमींचा पाठिंबा मिळाला. साखळी सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला. पण पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना पराभवापेक्षा हस्तांदोलनाचा मुद्दा जिव्हारी लागला. यानंतर पाकिस्तानच्या संघ व्यवस्थापनाने एशियन क्रिकेट काउन्सिलकडे तक्रार केली. पण त्यांच्या तक्रारीनंतर भारतावर कारवाई झाली नाही. या प्रकारात पाकिस्तानची आणखी छी थू झाली. अशा वातावरणात भारत पाकिस्तान पुन्हा समोरासमोर येत आहेत. विशेष म्हणजे साखळी सामन्यापाठोपाठ सुपर फोर फेरीतील सामन्यासाठीही सामनाधिकारी म्हणून अँडी पायक्रॉफ्ट यांचीच नियुक्ती झाली आहे. यामुळे पुढे काय होणार ? याकडे अनेकांचे लक्ष आहे.


टी २० क्रिकेटमध्ये पाकिस्तान विरुद्ध आतापर्यंत भारताचे पारडे जड राहिल्याचे चित्र आहे. यामुळे टीम इंडियाकडून भारतीय क्रिकेटप्रेमींन भरपूर अपेक्षा आहेत. भारत १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्धचा सामना सात विकेट राखून जिंकला. यानंतर भारत १९ सप्टेंबर रोजी ओमान विरूद्धचा सामना २१ धावांनी जिंकला. ओमान विरूद्धच्या सामन्यात भारताने फलंदाजी आणि गोलंदाजीत अनेक प्रयोग केले. यामुळे ४८ तासांपेक्षा कमी वेळात पुन्हा मैदानात उतरत असलेला भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध कसे डावपेच आखणार यावरुन मोठ्या प्रमाणात तर्कवितर्क सुरू आहेत.




  1. भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल/अर्शदीप सिंग.

  2. पाकिस्तानची संभाव्य इलेव्हन: साहिबजादा फरहान, सॅम अयुब, फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), हसन नवाज, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद.

  3. भारत-पाकिस्तान सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल, तर सोनी लिव्ह अॅपवर थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल. सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल आणि टॉस (नाणेफेक) सायंकाळी ७:३० वाजता होईल.


Comments
Add Comment

'न्यूझीलंड'ने इंदोरमध्ये उधळला विजयाचा गुलाल!

कोहलीची झुंजार खेळी व्यर्थ; भारताचा ४१ धावांनी पराभव इंदोर (वृत्तसंस्था) : न्यूझीलंड संघाने भारताचा तिसऱ्या

किवींच्या 'मिशेल-फिलिप्स'चा झंझावात; निर्णायक वन-डेमध्ये भारतासमोर हे लक्ष्य

इंदूर (वृत्तसंस्था): भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात रविवारी इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर वन-डे मालिकेतील

Shubman Gill water purifier : मॅचपेक्षा पाण्यावर लक्ष! शुभमन गिलने इंदूरमध्ये नेले ३ लाखांचे वॉटर प्युरिफायर

इंदूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वन-डे मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे, त्यामुळे इंदूरमध्ये होणारा तिसरा

भारतीय संघाच्या टी-२० विश्वचषक मोहिमेला सुरुंग

सुंदर दुखापतग्रस्त; आयुष बदोनीला संधी? मुंबई : आगामी टी-२० वर्ल्ड कपच्या तोंडावर भारतीय क्रिकेट संघाच्या अडचणीत

टी-२० मध्ये शतकांच्या यादीत डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या स्थानावर

विराट कोहलीचा विक्रम मोडला मुंबई : ३९ वर्षीय डेव्हिड वॉर्नरने बिग बॅश लीगमध्ये पुन्हा धावांचा पाऊस पाडला. सिडनी

विराट कोहलीच्या बाबतीत आयसीसीने चूक वेळीच सुधारली

८२५ नव्हे, तर १५४७ दिवस होता अव्वल स्थानी मुंबई : विराट कोहलीने आयसीसी वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत चार