समुद्रात अडकलेल्या लोकांना आता रोबोट वाचवणार!

समुद्रकिनाऱ्यावरील आपत्कालीन परिस्थितीसाठी बीएमसी ६ रोबोटिक बोटी खरेदी करणार 


मुंबई: मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर भरतीदरम्यान अनेक आपत्कालीन परिस्थिती उद्भवत असते, आणि त्यासाठी बीएमसीची वॉटर रेस्क्यू टीम ही नेहमी तैनात असतात. मात्र आता, आधुनिक तंत्रज्ञान आणि AI चा जमाना असल्याकारणामुळे, मुंबई महानगरपालिकेत देखील लवकरच रोबोट काम करताना दिसून येणार आहे. जे मुंबई समुद्रात किंवा किनाऱ्यावर आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या लोकांचे जीव वाचवतील.


यासाठी, बीएमसी प्रशासनाने रोबोटिक वॉटर रेस्क्यू सिस्टम स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत, ६ रोबोटिक बोटी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



रोबोट खरेदीसाठी नवीन निविदा जारी


या उपक्रमासाठी पूर्वीचा निविदा रद्द करून नवीन निविदा जारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये मेक-इन-इंडिया मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय कंपनीकडून हे रोबोटिक सिस्टम खरेदी केल्या जातील. या पूर्वीच्या निविदेत भारतीय पुरवठादार तुर्कीच्या मारेन रोबोटिक्सकडून सागरी सुरक्षेसाठी सहा रोबोटिक बोटी खरेदी करण्याचा समावेश होता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ही निविदा काढण्यात आली होती. मात्र, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षदरम्यान तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळे ऑपरेशन सिंदूरनंतर तुर्कीयेला धक्का देत बीएमसी प्रशासनाने पूर्वी जारी केलेले निविदा रद्द केले. त्यामुळे, नव्या निविदानुसार भारतीय कंपनीकडूनच बीएसमी रोबोटिक बोटीची खरेदी करणार आहेत. या बोटी मुंबई अग्निशमन दलाला सागरी बचाव कार्यासाठी मदत करतील.  या बोटी गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, गोराई आणि अक्सा समुद्रकिनाऱ्यांवर तैनात केल्या जातील. एका बोटीची किंमत ₹९.६२ लाख इतकी होती. प्रत्येक बोटीची क्षमता २०० किलो असेल आणि कमाल १८ किमी/तास वेग असेल. 


 
Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून