PM Modi Address to Nation: पंतप्रधान मोदी आज करणार महत्वपूर्ण घोषणा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ५.०० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. यात ते अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण देशाच्या नजरा संध्याकाळी होणाऱ्या मोदींच्या भाषणावर आहे. यादरम्यान ते महत्वपूर्ण घोषणा देखील करू शकतात. ज्यात उद्यापासून लागू होणाऱ्या नवीन जीएसटी दराचा देखील समावेश असेल. तूर्तास, पंतप्रधान मोदींच्या भाषणाच्या विषयावर कोणतेही अधिकृत विधान अद्याप आलेले नाही.



नव्या जीएसटी दराबद्दल चर्चा


पंतप्रधानांच्या भाषणाच्या विषयाबाबत, मीडिया रिपोर्ट्समध्ये असा अंदाज लावला जात आहे की ते जीएसटी सुसूत्रीकरणावर चर्चा करू शकतात. मुळात उद्यापासून नवीन जीएसटी दर २.० देशात लागू होणार आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर मोदी जनतेला संबोधित करण्याची शक्यता आहे. 


भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणात घोषणा केली होती की, भावी जीएसटी सुसूत्रीकरणाचे नियम आणि दर दिवाळीपर्यंत लागू होतील. त्यानंतर, जीएसटी परिषदेच्या बैठकीत दोन जीएसटी दर (१२ आणि २८ टक्के) काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २३ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी शुल्क नियम लागू होणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी जाहीर केले होते.  आज नवरात्रीच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांचे होणारे  भाषण हे याच मुद्द्यावर असेल, असा अंदाज आहे. नवरात्रीच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांचे भाषण 


उद्यापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. तर पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी जनतेला संबोधित करणार आहे. सध्या सणासुदीचा काळ असून या काळात अनेक वस्तूंची खरेदी केली जाते. त्यामुळे उद्यापासून लागू होणाऱ्या नव्या जीएसटी शुल्क दरानुसार काय महागणार आणि काय स्वस्त होणार? हे जाणून घेणे महत्वाचे ठरणार आहे. याच कारणामुळे मोदींचे आज नवरात्रीच्या पूर्वसंध्येला होणारे भाषण जनसामान्यांसाठी महत्वाचे ठरणार आहे.


 
Comments
Add Comment

जम्मू-काश्मीरमध्ये २,९०० किलो स्फोटके जप्त!

दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश: दोन डॉक्टरांसह सात जणांना अटक श्रीनगर : जम्मू-काश्मीर पोलिसांनी आंतरराज्यीय व

Gujarat News : गुजरात एटीएसची मोठी कारवाई! घातक विष 'रायसिन' तयार करणाऱ्या डॉक्टरसह तिघांना अटक

अहमदाबाद : गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) राज्यात मोठे दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट उधळून लावत, चिनी एमबीबीएस

देशातील पहिला अत्याधुनिक एचपीसीएल रिफायनरी अंतिम टप्प्यात

या प्रकल्पामुळे बलोतरा आणि पाचपद्रा परिसराचा चेहरामोहरा बदलला सीमा पवार बाडमेर : हिंदुस्तान पेट्रोकेमिकल्स

चंद्रयान-२ पुन्हा चर्चेत; इस्राोने शेअर केली मोठी माहिती !

नवी दिल्ली : सहा वर्षांपूर्वी प्रक्षेपित झालेल्या चंद्रयान-२ बद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो)

डिजिटल सोन्यात गुंतवणूक करत असाल तर सावधान !

आम्ही जबाबदार नाही; सेबीचा सतर्कतेचा इशारा नवी दिल्ली  : बदलत्या काळानुसार सोन्यातील गुंतवणुकीच्या

बिहार निवडणुकीचा प्रचार संपला

दुसऱ्या टप्प्यासाठी १२२ जागांवर मंगळवारी मतदान पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा उडालेला धुरळा आता बसला आहे.