‘महादेवी’च्या अनुपस्थितीतच नांदणी मठात नवरात्रोत्सव साजरा होणार ?

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाने महादेवी हत्तीण नांदणी मठाकडे पाठविण्यासंदर्भात उच्चस्तरीय समितीने निर्णय घ्यावा,असा आदेश दिला होता. यानंर उच्चस्तरीय समितीकडे नांदणी मठ, राज्य शासन व वनताराकडून अर्ज दाखलही करण्यात आला होता. मात्र या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास उच्चस्तरीय समितीने नकार दिला आहे. त्यामुळे आता यंदाच्या नवरात्र उत्सवात महादेवी हत्तीण नांदणी मठात येण्याची शक्यता कमी झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वनतारा प्रशासनाकडून अहवाल मिळेपर्यंत कोणताही निर्णय घेता येणार नाही, असे उच्चस्तरीय समितीने म्हटले आहे. सध्या तो अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्याने आणि त्याच्या प्रक्रियेस विलंब होत असल्याने, सोमवारपासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवात महादेवी हत्तीण पुन्हा मठात आणली जाणार नाही, असे संकेत मिळत आहेत.

कोल्हापूरच्या नांदणी येथील जैन मठात ३३ वर्षांपासून असलेली माधुरी उर्फ महादेवी हत्तीण याबाबतचा वाद “महादेवी हत्ती प्रकरण” म्हणून ओळखला जातो. नांदणी मठासह नागरिकांची तिला वनतारामधून कोल्हापूरला परत आणण्याचा आग्रह आहे. तर न्यायालय व प्राणीसंवर्धन संस्था हिच्या आरोग्य व कल्याणाला प्राधान्य देत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तिला जामनगरच्या “वनतारा” पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आले असून, या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यामुळे धार्मिक भावना, जनआंदोलन आणि प्राणीसंवर्धन कायदे अशा तिघांच्या कचाट्यात हे प्रकरण अडकल्याने राज्यभर चर्चेत आहे.
Comments
Add Comment

पुण्यातील सायकल स्पर्धेनिमित्त सिंहगड किल्ल्यावर जाणारी वाहतूक पुढील ३ दिवस बंद, पर्यटकांना पायी मार्ग वापरण्याचा पर्याय

पुणे: पुण्यातील सिंहगड किल्ला नेहमीच पर्यटकांचे आकर्षण केंद्र राहिला आहे. मात्र आजपासून पुढील ३ दिवस सिंहगड

‘युनेस्को’च्या वर्ल्ड बुक कॅपिटल या दर्जासाठी पुण्याची दावेदारी

पुणे : ‘युनेस्को’च्या ‘जागतिक पुस्तक राजधानी’ (वर्ल्ड बुक कॅपिटल) या दर्जासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात! ट्रक चालकाचा ताबा सुटला अन् बॅरियर ओलांडत थेट चारचाकीवर उलटला

मुंबई: पुणे–मुंबई द्रुतगती महामार्गावर आज पहाटे एक भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील

ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातील ८०० एकर जागेचे होणार पर्यावरणीय पुनरुज्जीवन

मुंबई : विदर्भातील विविध विकास कामांबरोबरच तेथील जंगल संपदा राखण्यासाठी व त्याच्या वाढीसाठी मुख्यमंत्री

नागपूरमध्ये अतिविशेषोपचार वैद्यकीय अभ्यासक्रमांसह ६१५ खाटांचे रुग्णालय

नागपूर : नागपूर येथे वैद्यकीय उपचाराच्या दर्जेदार सुविधा रुग्णांना उपलब्ध व्हाव्यात आणि वैद्यकीय

शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एसटीची हेल्पलाईन

धाराशिव (प्रतिनिधी) - शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी