आयफोन १७ प्रो मॅक्स खरेदी करणारा पहिला तरुण

नवी दिल्ली : मुंबईमध्ये राहणाऱ्या अंकुश गोयल याने भारतातील पहिला आयफोन १७ प्रो मॅक्स खरेदी करण्याचा मान मिळवला आहे. रेकॉर्डमुळे सध्या तो चर्चेत आहे. अॅपल कंपनीची आयफोन १७ प्रो मॅक्स स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तो रात्रभर जेवण आणि पावर बँक घेऊन मुंबईतील ॲपलच्या बीकेसी स्टोअरबाहेर उभा राहिला होता.


दरवर्षी ॲपलच्या नवीन आयफोनच्या लाँचवेळी देशभरात मोठी गर्दी दिसून येते. मात्र, मुंबईतील ॲपल स्टोअरबाहेर दिसलेली क्रेझ यावर्षी लक्षवेधी ठरली. या गर्दीतूनच २६ वर्षीय अंकुश गोयलचे नाव समोर आले. मिळालेल्या माहितीनुसार, मार्केटिंग प्रोफेशनल असलेला अंकुश हा आयफोन १६ आणि १५ सिरीजचा देखील भारतातील पहिला ग्राहक ठरला होता. अमेरिका आणि इतर देशांमध्ये आयफोन लाँचच्या वेळी दिसणाऱ्या उत्साहानेच त्याला प्रेरणा मिळाल्याचे त्याने सांगितले.


गुरुवार रात्रीपासूनच अंकुशने ॲपल स्टोअरबाहेर आपली जागा पकडली. सोबत जेवणाचा डबा आणि मोबाइल चार्ज करण्यासाठी पॉवर बँक होती. तासनतास रांगेत उभे राहिल्यानंतर, सकाळी त्याने सर्वात आधी २५६जीबी स्टोरेज असलेला आयफोन १७ प्रो मॅक्स खरेदी केला. आयफोनला घेऊन असलेले त्याचे हे वेड पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. अंकुशचे हे कृत्य सोशल मीडियावरही चांगलेच चर्चेत आले आहे.

Comments
Add Comment

उद्या अवकाशात 'सुपर मून'ने उजळणार रात्र!

चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ येणार नवी दिल्ली : नववर्ष २०२६ च्या सुरुवातीलाच अर्थात उद्या ३ जानेवारी २०२६ रोजी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनात्मक रचनेत लवकरच बदल

प्रयागराज : शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या संघटनात्मक रचनेत बदल करण्याची तयारी

‘निमेसुलाईड’ पेनकिलर औषधावर केंद्र सरकारची बंदी

१०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त क्षमतेच्या गोळ्यांच्या विक्रीस मनाई नवी दिल्ली : सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी अशा

ॲमेझॉनच्या भारतातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची परवानगी

एच १-बी व्हिसाच्या कठोर नियमांमुळे कामात बदल नवी दिल्ली : ॲमेझॉनने व्हिसा मिळण्यास विलंब होत असल्यामुळे भारतात

बुलेट ट्रेनच्या मुहूर्ताची घोषणा!

१५ ऑगस्ट २०२७ ला धावणार, रेल्वे मंत्र्यांची घोषणा नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनच्या लोकार्पणाचा

बिहारच्या रस्ते विकासासाठी २०२६ ठरणार महत्त्वाचे! केंद्र सरकाने दिला महामार्गाला हिरवा कंदील

बिहार: बिहारच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी २०२६ हे वर्ष महत्त्वाचे ठरणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या