मोहित सोमण:जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता लक्षात घेता आज जागतिक सोन्याच्या कमोडिटीत मोठी वाढ झाली. त्यातच रूपयांच्या तुलनेत डॉलरमध्ये होणारी सातत्याने वाढ यामुळे सोने प्रचंड महागले आहे. आज तर सोन्याने नवा विक्रम प्रस्थापित करत ११२१५० रूपयांवर प्रति तोळा दर पोहोचला आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ८२ रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ७५ रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ६१ रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी ११२१५ रूपये, २२ कॅरेटसाठी १०२८० रूपये, १८ कॅरेटसाठी ८४११ रूपयांवर गेले आहेत.संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ८२० रूपये, २२ कॅरेट तोळा किंमतीत ७५० रूपये, १८ कॅरेट तोळा किंमत ६१० रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे प्रति तोळा सोन्याचा दर २४ कॅरेटसाठी तब्बल ११२१५० रूपये, २२ कॅरेटसाठी १०२८०० रूपये, १८ कॅरेट साठी ८४११० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये सोन्या चा निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.०५% वाढ झाली आहे. जागतिक मानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत तब्बल १.११% वाढ झाल्याने प्रति डॉलर दरपातळी ३६८४.९८ पातळीवर पोहोचले आहेत. मुंबईसह भारतातील प्रमु ख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १११२६ रुपये, २२ कॅरेटसाठी १०२९० रूपये, १८ कॅरेटसाठी ८५२० रूपयांवर पोहोचला आहे. सोन्यातील ही सलग दुसऱ्यांदा वाढ झाली आहे.
चांदीच्या दरातही वाढ कायम !
'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दर २ रुपयांनी वाढला असून प्रति किलो दर तब्बल २००० रूपयांनी वाढला आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर १३५ रुपयांवर व प्रति किलो दर १३५००० रूपयांवर गेला आहे. सोन्यासह चांदीच्या दरातही स लग दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. जागतिक पातळीवर सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.९८% वाढ झाली असून भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.२०% वाढ झाली आहे.त्यामुळे आज सलग दोनदा सोन्याच्या व चांदीच्या दरात वाढ झाली असल्याने फेडरल रिझर्व्ह व्याजदरातील किरकोळ कपातीचा दबाव कमोडिटीत दिसत आहे.विशेषतः आगामी युएस बाजारातील आकडेवारी, रशिया युक्रेन संघर्ष, मध्यपूर्वेतील संघर्ष, तसेच टॅरिफची आंतरराष्ट्रीय बाजाराती ल अस्थिरता त्यातून आणखी घसरणारा रूपया गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचांदीत गुंतवणूकीसाठी संधी मिळत आहे. परिणामी ईपीएफ व प्रत्यक्ष सोन्या व चांदीच्या गुंतवणूकीत वाढ होताना दिसत आहे.