'कल्की 2898 AD' मधून काढल्यानंतर दीपिकाची भावनिक पोस्ट !

मुंबई : दीपिका पादुकोण सध्या चर्चेचा विषय बनली आहे. अलीकडेच तिला प्रभासच्या 'कल्की 2898 AD' या चित्रपटाच्या सिक्वेलमधून आणि संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरीट’ या आगामी सिनेमातून काढण्यात आलं होतं. दीपिकाचे वागणे ‘अनप्रोफेशनल’ आहे असा आरोपही तिच्यावर झाला. या सर्व वादानंतर दीपिकाने एक खास सोशल मीडिया पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.


तिने इन्स्टाग्रामवर अभिनेता शाहरुख खानचा हात पकडलेला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये फक्त दोघांचे हात दिसत असून, चेहऱ्यांचा काहीही उल्लेख नाही. या पोस्टला तिने एक भावनिक कॅप्शन दिलं आहे, ज्यामध्ये ती म्हणते:





“जवळपास १८ वर्षांपूर्वी ‘ओम शांती ओम’च्या सेटवर शाहरुखने मला एक गोष्ट शिकवली – चित्रपटाचं यश महत्त्वाचं असतंच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं असतं तो अनुभव आणि माणसे . मी ही शिकवण कायम लक्षात ठेवली आहे आणि कदाचित याचमुळेच आपण आता एकत्र सहावा चित्रपट करत आहोत.


‘किंग’ Day1 या पोस्टमध्ये तिने #King हॅशटॅग वापरला असून, यामध्ये शाहरुख खान व दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांचाही उल्लेख केला आहे. यावरून स्पष्ट होतं की, ‘किंग’ चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आहे.


दीपिका आणि शाहरुखची जोडी नेहमीच बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरली आहे. ‘ओम शांती ओम’पासून ते ‘पठाण’ आणि ‘जवान’ पर्यंत त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. आता हे दोघं सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘किंग’ या नव्या प्रोजेक्टमध्ये पुन्हा एकत्र येत आहेत.


या चित्रपटात दीपिका आणि शाहरुखबरोबरच सुहाना खान, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, अर्शद वारसी, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन, जयदीप अहलावत आणि अभय वर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.


याशिवाय दीपिका लवकरच ॲटली दिग्दर्शित AA22xA6 या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबतही झळकणार आहे.

Comments
Add Comment

बॉलिवूड अभिनेता संजय मिश्राने खरेदी केली आलिशान सीफेस अपार्टमेंट: किंमत ऐकून व्हाल थक्क !

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय मिश्राने मढ येथे एक महागडे सीफेस अपार्टमेंट खरेदी केली आहे. मढ परिसर चित्रपटांच्या

आणि रंगमंचावर अवतरल्या ‘त्या तिघी’

आणि रंगमंचावर अवतरल्या ‘त्या तिघी’ राज चिंचणकर यंदा पावसाने मुंबईत बराच धुमाकूळ घातला आणि त्याचा परिणाम

‘आतली बातमी फुटली’द्वारे मराठीत पदार्पण

‘आतली बातमी फुटली’द्वारे मराठीत पदार्पण युवराज अवसरमल आतली बातमी फुटली’ हा नवीन चित्रपट आलेला आहे. या

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या

कपिल शोच्या ग्रँड फिनालेत अक्षय कुमारचा जलवा !

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल