‘आतली बातमी फुटली’द्वारे मराठीत पदार्पण

‘आतली बातमी फुटली’द्वारे मराठीत पदार्पण


युवराज अवसरमल

आतली बातमी फुटली’ हा नवीन चित्रपट आलेला आहे. या चित्रपटाचे लेखक, निर्माता व दिग्दर्शनाची धुरा आपल्या खांद्यावर वाहून नेणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे विशाल पी. गांधी होय.विशालचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे शालेय शिक्षण सांताक्रूझच्या जे. एम. एल. या शाळेत झाले. शाळेत ते पियानो वाजवायचे. स्टोरी लिहिण्याची त्यांना खूप आवड होती. स्टोरी लिहिण्याच्या क्लासला ते गेले होते. त्यानंतर ते एम. एन. के. कॉलेज जे वांद्रेच्या नॅशनल कॉलेजच्या पाठीमागे आहे, त्या कॉलेजला ते गेले. त्यांनी वाणिज्य शाखेमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी बी. एम. एस.(बॅचलर ऑफ मॅनेजमेंट) केले. त्याच्या कॉलेजच्या बाजूला गॅलेक्सी, गेइटी थिएटर होते. त्या थिएटरमध्ये ते प्रत्यक्ष दर शुक्रवारी नवा चित्रपट पाहायचे. एका दिवसात दोन ते तीन चित्रपट देखील त्यांनी पाहिले आहेत, म्हणजे चित्रपटाची आवड त्यांना कॉलेज जीवनापासून लागली होती. त्यानंतर त्यांनी असा निर्णय घेतला की आपल्याला या मनोरंजनाच्या क्षेत्रातच काहीतरी करायचं आहे. त्यानंतर त्यांनी सुभाष घईच्या विस्लिंग वूड या इन्स्टिट्यूटमधून प्रशिक्षण घेतले. दोन वर्षांचा कोर्स होता, या दोन वर्षांच्या कोर्समध्ये त्यांनी शॉर्ट फिल्म बनविल्या. नंतर त्यांनी शाहरुख खानच्या रेड चिली इंटरटेनमेंट या संस्थेसाठी एक्झिक्युटिव्ह प्रोडूसर म्हणून काम पाहिले, त्या कालावधीमध्ये त्यांनी अनेक टेलिव्हिजन शो, इव्हेंट प्रोग्राम केले. रंग दे बसंती, सौदागर या चित्रपटाचे लेखक कमलेश पांडे यांच्याकडे त्यांनी स्टोरी लिखाणाचे प्रशिक्षण घेतले.
त्यानंतर त्यांनी जाहिरात क्षेत्रात मोठ्या ब्रँडच्या जाहिराती केल्या. गुगल इंडिया, टाटा मोटर्स, सर्फ एक्सेल, जॉन्सन अँड जॉन्सन या मोठमोठ्या नामांकित जाहिराती त्यांनी केल्या. त्यानंतर २०२० ला कोविड सुरू झाला. त्यावेळेला ते पुन्हा सुभाष घईशी जोडले गेले. सुभाष घई यांच्या प्रॉडक्शनसाठी त्यांनी एक चित्रपट निर्माण केला त्याचं नाव होतं ‘३६ फार्म हाऊस’. त्या चित्रपटासाठी काम पाहिले त्याच वेळेला त्याचे स्वतःचेही प्रोडक्शन सुरू झाले होते. त्या प्रोडक्शन हाऊसमार्फत देखील त्यांनी जवळपास ५० ते ६० जाहिराती निर्माण केल्या. त्यानंतर त्यांनी ‘जानकी’ नावाची दूरदर्शनसाठी सिरीयल सुभाष घईच्या बॅनरतर्फे केली. त्या मालिकेसाठी ते सहनिर्माते होते.

त्यानंतर त्यांनी एक मराठी चित्रपट निर्माण करण्याचा निर्णय घेतला. ‘आतली बातमी फुटली’ या नावाने तो चित्रपट आला आहे. या चित्रपटामध्ये एक साधारण रिक्षा ड्रायव्हर त्याची परिस्थिती हलाखीची असल्याने चोरी करायला जातो, चोरी केल्यानंतर तो पळतो, पोलिसांपासून वाचतो आणि एका चाळीमधील घरामध्ये शिरतो. त्याला वाटतं की तो वाचतो; परंतु त्या चाळीच्या घरामध्ये पोलिसांपेक्षा खतरनाक असा एक व्यक्ती असतो की ज्याचा प्लॅन पाहून हा देखील आश्चर्यचकित होतो आणि तो प्लॅन काय असतो ते शेवटी तुम्हाला चित्रपटात कळणार आहे. यामध्ये त्यांना चांगल्या कलाकारांची साथ लाभलेली आहे सिद्धार्थ जाधव, डॉक्टर मोहन आगाशे, रोहिणी हट्टंगडी, भारत गणेशपुरे असे कलावंत त्यांना लाभल्यामुळे एक चांगली कलाकृती निर्माण झालेली आहे. ज्या वेळेला त्यांना डॉक्टर भास्कर वानखेडे या व्यक्तिरेखेसाठी एक पात्र निवडायचे होते. तिथे पात्र असे हवे ते त्यांचा चेहरा गंभीर, भेदक नजर व विनोदी, त्यांना समय सूचकता असली पाहिजे, मग त्यांच्या डोळ्यांसमोर फक्त डॉक्टर मोहन आगाशे आले व त्यांची निवड झाली. त्यांच्या पत्नीच्या व्यक्तिरेखेसाठी तशाच प्रकारची अभिनेत्री त्यांना हवी होती ती त्यांना रोहिणीच्या रूपात भेटली आणि सिद्धार्थ जाधव ज्याने रिक्षा ड्रायव्हरची भूमिका केलेली आहे, त्याची एनर्जी त्यांना खूप आवडली. तो त्याच्या मुलीसाठी एक अंगाई गीत गातो आणि त्या अंगाई गीतामुळे वडील व मुलीचे प्रेम प्रेक्षकांना पाहता येईल. या चित्रपटामध्ये एक धमाल असं ‘सखुबाई’ गाणं प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि या गाण्यासाठी त्यांनी चक्क गौतमी पाटील यांना घेतले आहे. तिची डान्सची एनर्जी सिद्धार्थ जाधवच्या एनर्जीशी मिळती-जुळती असल्याने एक चांगलं गाणं प्रेक्षकांना पाहता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. विजय निकम एका दमदार भूमिकेमध्ये आहे. मोहन आगाशे व सिद्धार्थ जाधव यांच्यामध्ये अभिनयाची जुगलबंदी या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. डॉ. मोहन आगाशे मास्टर आहेत तर सिद्धार्थ जाधव ब्लास्टर आहे. हा चित्रपट एक सस्पेन्स थ्रिलर, सिच्युएशनल कॉमेडी चित्रपट आहे.

चंद्राची गोष्ट, सखुबाई, जालीम सरकार, आतली बातमी फुटली हे रॅप अशी वेगवेगळ्या मूडची चार गाणी या चित्रपटामध्ये आहेत. चैतन्य कुलकर्णी यांनी लिहिलेल्या गाण्यांना जावेद अली, सुनिधी चौहान, प्रेमराज, सोनाली सोनवणे, एग्नेल रोमन यांचा स्वरसाज लाभला असून चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी एग्नेल रोमन यांनी सांभाळली आहे. वीजी फिल्म बॅनरअंतर्गत असलेल्या चित्रपटाची. कथा जैनेश इजरदार यांची असून सहयोगी दिग्दर्शक जीवक मुनतोडे आहेत. राहुल ठोंबरेने गाणी नृत्य दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांची मनोरंजनाची सफर होईल, असा विश्वास विशाल पी. गांधीनी व्यक्त केला.या चित्रपटाने त्यांच्या जीवनातील टर्निंग पॉइंटला सुरुवात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या चित्रपटाची निर्मिती विशाल पी. गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांची आहे. सहनिर्माता अम्मन अडवाणी आहे.
Comments
Add Comment

गौतमी पाटीलचा डान्स आणि स्वप्नील जोशी व भाऊ कदमची भन्नाट केमिस्ट्री प्रेक्षकांना पहायला मिळणार!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत आता एक दमदार आणि हटके जोडी प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ती जोडी आहे

अ‍ॅटलीच्या आगामी सिनेमात दिसणार दीपिका आणि अल्लू अर्जुन... यावर काय म्हणाला रणवीर सिंह

मुंबई : जवान फेम दाक्षिणात्य दिग्दर्शक अ‍ॅटलीच्या आगामी चित्रपटात दीपिका पदुकोण आणि अल्लू अर्जुन दिसणार आहेत

दिवाळीच्या आधी परिणितीने दिली गुड न्यूज , परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा झाले आईबाबा...

चड्डा घराण्यात चिमुकल्याचा आगमन झालं आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्डाने दिली गुड न्युज. परिणीती आणि राघव यांनी

माझं कधी काय होईल मला माहित नाही... नाव ठेवणाऱ्यांना स्पष्टच बोलल्या उषा नाडकर्णी

मुंबई : मराठी तसेच हिंदी सिनेइंडस्ट्री मधल्या उषा नाडकर्णी बरेचदा त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात.

अभिनेत्री काजोलचे कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांना दुखावणारे वक्तव्य, उफाळला नवा नाद

मुंबई : सध्या बॉलीवूडच्या अभिनेत्री त्यांच्या कामाच्या वेळेबद्दल काही ना काही वक्तव्य करत आहेत. सर्वात आधी

२०२६ ची होळी सनी देओलसाठी ठरणार का महत्त्वाची ? आगामी चित्रपटाची तारीख जाहीर

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सनी देओल त्याच्या नवीन चित्रपटामधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याबाबत त्याने