सात महिन्यांत राज्यात आणखी १४.७१ लाख नव्या मतदारांची भर

सात महिन्यांत राज्यात आणखी १४.७१ लाख नव्या मतदारांची भर


आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर थेट परिणाम


मुंबई (प्रतिनिधी) :
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान अवघ्या सहा महिन्यांत ४०.८१ लाख मतदारांची वाढ झाल्याबाबत विरोधकांकडून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आता विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या सात महिन्यांत राज्यात आणखी १४.७१ लाख नव्या मतदारांची भर पडली आहे. विशेष म्हणजे, ही वाढ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर थेट परिणाम करणारी ठरणार आहे.
२७ नोव्हेंबर २०२४ ते ३० जून २०२५ या कालावधीत राज्यातील मतदारांची संख्या ९,७०,२५,११९ वरून ९,८४,९६,६२६ इतकी झाली आहे. म्हणजेच एकूण १८,८०,५५३ नव्या मतदारांनी नोंदणी केली आहे. याचदरम्यान ४,०९,०४६ जुन्या मतदारांची नावे वगळण्यात आली असून, अंतिमतः एकूण १४,७१,५०७ मतदारांची वाढ झालेली आहे. गेल्या निवडणुकांदरम्यान मतदार यादीतील आकडेवारीवर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांनी मात्र या नवीन वाढीव मतदारांविषयी अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार निवडणूक आयोगाकडे नोंदवलेली नाही.


डिजिटल स्वरूपात मतदारयादी उपलब्ध
नवीन मतदारयादी मुख्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होती, मात्र त्यावर कोणाच्या हरकती अद्याप आल्या नसल्याचेही समजते. नवीन मतदारयादी केंद्रीय निवडणूक कार्यालयाने आयोगाला मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत 'डिजिटल' स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे.


घरबदलामुळेही मोठ्या प्रमाणावर नोंदणी
या नव्या मतदारांपैकी १.९६ लाख मतदार हे घरबदलामुळे म्हणजेच एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात स्थलांतर झाल्यामुळे नव्याने नोंदले गेले आहेत. यामध्ये सर्वाधिक वाढ पुणे (३२,०३१), ठाणे (२७,३८६), आणि मुंबई उपनगर (२५,८३१) या जिल्ह्यांमध्ये झाली आहे.


सर्वाधिक मतदार वगळलेले पाच टॉपचे जिल्हे
ठाणे : ४५ हजार ८००.
मुंबई उपनगरे : ४४ हजार १७२.
पुणे : ४३ हजार ९६१.
नाशिक : ३५ हजार ४७९.
जळगाव : २६ हजार ६३९.
सर्वाधिक मतदार वाढलेले पाच टॉपचे जिल्हे
ठाणे : २ लाख २५ हजार ८६६.
पुणे : १ लाख ८२ हजार ४९०.
पालघर : ९७ हजार १००.
मुंबई उपनगरे : ९५ हजार ६३०.
नागपूर : ७० हजार ६९३.


सर्वाधिक मतदार असलेले टॉपचे पाच जिल्हे
पुणे :
९० लाख ३२ हजार ८०.
मुंबई उपनगरे :
७७ हजार ८१ हजार ७२८.
ठाणे :
७४ लाख ५५ हजार २०५.
नाशिक :
५१ लाख २८ हजार ९७४.
नागपूर :
४५ लाख ९६ हजार ६९०.

Comments
Add Comment

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास

Mumbai Crime : शिक्षकाच्या फोटोचा सोशल मीडियावर गैरवापर, मुंबईच्या महापौरांशी जोडलं नाव; गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईच्या महापौर ऋतू तावडे (Ritu Tawde) यांचे पती असल्याचा खोटा दावा करत एका फोटोग्राफी शिक्षकाची बदनामी करणारा

Free ST Travel : आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना मोफत एसटी प्रवास; जाणून घ्या कोणत्या मार्गांवर धावणार विशेष बस?

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.