ICC महिला विश्वचषक 2025: श्रेया घोषालच्या आवाजात ‘ब्रिंग इट होम’ थीम सॉन्ग प्रदर्शित!

मुंबई : महिला क्रिकेटमधील सामर्थ्य, एकता आणि थांबवता न येणाऱ्या जिद्दीचा उत्सव साजरा करत, इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) ने आज आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ साठी अधिकृत गाण्याचे अनावरण केले आहे. ‘ब्रिंग इट होम’ या नावाने प्रसिद्ध होणारे हे गाणे जगभरातील चाहत्यांना एकत्र आणण्याच्या उद्दिष्टाने बनवण्यात आले आहे.


प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांनी हे गाणे गायले असून, त्यात ऊर्जा, भावना आणि संगीताचा सुंदर संगम पाहायला मिळतो. गाण्यातील प्रत्येक बोल हे महिला क्रिकेटपटूच्या संघर्षाची आणि स्वप्नांची आठवण करून देतात.


गाण्याचे बोल जिद्द, एकता आणि चिकाटीचे प्रतीक आहेत. “पत्थर पिघलाना है, एक नया इतिहास बनाना है” असे बोल महिला क्रिकेटच्या उत्क्रांतीला सलाम करत, कठीण परिस्थितीतही हार न मानणाऱ्या वृत्तीचे प्रतीक आहेत.


प्रेक्षकांना हे गाणे आणि त्याचे बिहाइंड-द-सीन्स व्हिडिओ पाहण्यासाठी विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. Spotify, Apple Music, Amazon Music, JioSaavn, YouTube Music, Instagram, Facebook आणि इतर ठिकाणी.


श्रेया घोषाल म्हणाल्या: “आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ चा भाग बनणे आणि त्याच्या अधिकृत गाण्याद्वारे महिला क्रिकेटचा आत्मा, ताकद आणि एकतेचा उत्सव साजरा करणे, हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. या गाण्याला आवाज देताना मी खूप प्रेरित झाले आणि मला आशा आहे की हे गाणे चाहत्यांना प्रेरणा देईल आणि या भव्य स्पर्धेचे अविस्मरणीय क्षण निर्माण करेल.”


आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ च्या १३ व्या सीजनसाठी तिकीट दर अगदी कमी ठेवण्यात आले आहेत. हे दर फक्त ₹१०० पासून सुरू होत आहेत, जे आयसीसीच्या कोणत्याही जागतिक स्पर्धेसाठी सर्वात कमी आहेत. तिकीट विक्रीला सुरुवात झाली असून ती सर्व चाहत्यांसाठी खुली आहे. Tickets.cricketworldcup.com वर तिकीटे उपलब्ध आहेत.


हे सामने ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर २०२५ दरम्यान होणार असून सामने डीवाय पाटील स्टेडियम (नवी मुंबई), एसीए स्टेडियम (गुवाहाटी), होळकर स्टेडियम (इंदूर), एसीए-व्हीडीसीए स्टेडियम (विशाखापट्टणम) आणि आर. प्रेमदास स्टेडियम (कोलंबो, श्रीलंका) येथे खेळवले जाणार आहेत.

Comments
Add Comment

IPL 2026 Sunil Gavaskar : सुनील गावस्करांची अनफिट क्रिकेटपटूंवर टीका

मुंबई : भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पुन्

IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

IPL 2026 Avesh Khan : लखनऊच्या विजयावरून वाद, आवेश खानच्या 'त्या' कृतीमुळे सनरायझर्स नाराज

मुंबई : रविवार ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी मात

बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा ४३ धावांनी पराभव केला. आयपीएल