या ५ तेलांचा उपयोग ठरेल केसांसाठी वरदान !

केसांची काळजी घेणे हे अनेकांसाठी खूप महत्वाचे असते. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी ट्राय करण्याची इच्छा असते, पण नेहमीच परिणाम तात्काळ दिसत नाहीत. खरं तर केसांची वाढ आणि त्यांची मजबुती हळूहळू होते, पण जर तुम्ही योग्य तेलांचा वापर नियमितपणे केला, तर नक्कीच फरक जाणवतो. या तेलांचा केवळ केसांच्या वाढीसाठी नव्हे तर स्काल्पचे आरोग्य राखण्यासाठी, केस गळती कमी करण्यासाठी आणि केसांना नैसर्गिक चमक देण्यासाठीही चांगला उपयोग होतो .


१. आर्गन तेल


आर्गन तेल हे “लिक्विड गोल्ड” म्हणून ओळखले जाते कारण यामध्ये व्हिटॅमिन ई आणि आवश्यक फॅटी ऍसिड्स मुबलक प्रमाणात असतात. आर्गन ऑइल टाळूमध्ये रक्ताभिसरण सुधारते आणि व्हिटॅमिन ई मुळे केसांच्या वाढीस मदत करते, ज्यामुळे केस गळती कमी होते. हे तेल केसांना निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी फायदेशीर आहे. आर्गन ऑइलमधील व्हिटॅमिन ई आणि इतर पोषक तत्वे केसांना खोलवर पोषण देतात. हे तेल केसांमधील कोंडा कमी करते आणि केसांच्या मुळांना बळकट करते. आर्गन ऑइल हेअर सीरम म्हणून वापरले जाऊ शकते, जे केसांना फ्रिझी होण्यापासून वाचवते आणि त्यांना मऊ बनवते. हे तेल खराब झालेल्या आणि कोरड्या केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.


वापर करण्याची पद्धत:
हे तेल थोडं गरम करून स्काल्पवर मऊ हातांनी लावा . नंतर केसांच्या संपूर्ण भागावर लावा. तुम्ही हे तेल काही तास तसेच ठेवू शकता किंवा संपूर्ण रात्रभर ठेवून नंतर शाम्पूने धुवा. आठवड्यातून दोनदा हे तेल वापरणं फायदेशीर ठरते, विशेषतः जर तुमचे केस ड्राय किंवा रासायनिक उपचारांनी खराब झालेले असतील तर.


२. एरंडेल तेल


एरंडेल तेल जास्त चिकटसर असतं, त्यामुळे ते वापरणं थोडं कठीण वाटू शकतं, पण त्याचा फायदा खूप मोठा आहे. या तेलात रिकिनोलिक अ‍ॅसिड आणि ओमेगा-६ फॅटी अ‍ॅसिड्स भरपूर प्रमाणात असतात, जे स्काल्पमध्ये रक्ताभिसरण वाढवतात आणि केसांच्या मुळांना पोषण देतात. हे तेल केस गळती कमी करण्यासाठी आणि केस जाड करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.


वापर करण्याची पद्धत:
एरंडेल तेल (नारळ तेल, बदाम तेल) यामध्ये मिसळा. नंतर या मिश्रणाने स्काल्पला किमान १०-१५ मिनिटे लावा . त्यानंतर शॉवर कॅप लावून ३० मिनिटे किंवा २ तास ठेवून नंतर धुवा. आठवड्यातून एकदा कॅस्टर तेलाचा वापर केल्यास केसांची मुळं मजबूत होतात आणि केस गळती कमी होते.


३. आवळा तेल


आवळा तेल केसांसाठी एक नैसर्गिक सुपरफूड आहे. आवळा तेलात व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे केसांना पोषण देतात आणि केसगळतीपासून संरक्षण करतात. याशिवाय, आवळा तेल डँड्रफ कमी करण्यास मदत करते.


वापर करण्याची पद्धत:
थेट स्काल्पवर आवळा तेल लावा आणि हळूवारपणे मालिश करा , ज्यामुळे संपूर्ण स्काल्पमध्ये केसांच्या मुळापर्यंत तेल पोहचेल . हे तेल किमान एक तास ठेवा किंवा नंतर धुवा. आठवड्यात २-३ वेळा याचा वापर केल्यास केसांची ताकद वाढते, केस चमकदार आणि मजबूत होतात.


४. रोजमेरी तेल


रोजमेरी तेल हे थोडं कमी प्रचलित असलं तरी केसांसाठी खूप फायदेशीर आहे. या तेलामुळे स्काल्पमध्ये रक्ताभिसरण सुधारते आणि केसांच्या मुळांतील सूज कमी होते. याशिवाय, याच्या अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे स्काल्प निरोगी राहतो आणि डँड्रफ कमी होतो.


वापर करण्याची पद्धत:
रोजमेरी तेल खूप ताकदवान असतं, त्यामुळे ते थेट वापरू नका. त्याऐवजी नारळ तेल किंवा जोजोबा तेलासह मिसळून वापरा. यानंतर स्काल्पला मऊ हातांनी मळा. याला किमान एक तास किंवा जास्त वेळ ठेवा, अगदी रात्रभर देखील ठेवता येते. आठवड्यातून २-३ वेळा वापरल्यास केस मजबूत होतात आणि डँड्रफच्या समस्येपासून मुक्तता मिळते.


५. नारळ तेल


नारळ तेल हे पारंपरिक आणि अत्यंत प्रभावी तेल आहे. हे तेल आपल्या केसांमध्ये खोलवर शिरून त्यांना मजबुती देते. यातील लौरिक अ‍ॅसिड केसांच्या प्रोटिन्सना संरक्षण देतो, ज्यामुळे केस तुटण्यापासून वाचतात.


वापर करण्याची पद्धत:
हे तेल हलकं असल्यामुळे तुम्ही ते धुतलेल्या किंवा थोडं ओल्या केसांवर थोड्या प्रमाणात लावू शकता. हातात काही थेंब घेऊन केसांच्या लांबगट आणि टोकांवर चांगले लावा. हे तेल धुवायची गरज नाही आणि तुम्ही दररोज वापरू शकता.


या तेलांच्या नियमित वापराने केसांचे आरोग्य सुधारते, केसांची वाढ होते आणि केस चमकदार दिसतात .

Comments
Add Comment

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या

कपिल शोच्या ग्रँड फिनालेत अक्षय कुमारचा जलवा !

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

साऊथ स्टार उन्नी मुकुंदन होणार 'पंतप्रधान' मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

Hair Care: केस गळती थांबवण्यासाठी 'या' ५ बियांचे सेवन करा, नैसर्गिकरित्या केस वाढतील

मुंबई : आजकाल बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे केस गळण्याची समस्या खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत, केसांचे