नीरज चोप्राने पाकिस्तानच्या अर्शद नदीमला मैदानात दिला नाही भाव

मुंबई: जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५मध्ये आज भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये सगळ्यांच्या नजरा नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम यांच्यावर होत्या. नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम यांच्यामुळे हा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान असा बनला होता.


दरम्यान, या स्पर्धेत दोन्ही खेळाडूंनी निराश केले. नीरज चोप्राला ८व्या स्थानावर समाधान मानावे लागले तर नदीम १०व्या स्थानावर राहिला.


पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव वाडले आहेत. आशिया कप स्पर्धेतही विजयानंतर भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नव्हते. यामुळे पाकिस्तानचा संघ चांगलाच खवळला होता. पाकिस्तानच्या संघाने यूएईविरुद्धच्या सामन्याआधीही खूप नाटकं केली होती. अखेरीस त्यांची नाटकं काही चालली नाहीत आणि त्यांना यूएईविरुद्ध सामना खेळावा लागला.


नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम जेव्हा फायनलमध्ये उतरले तेव्हा दोन्ही देशांच्या चाहत्यांच्या नजरा त्यांच्यावर होत्या. या सामन्यात नीरज चोप्राने एका पद्धतीने नदीमला कोणताच भाव दिला नाही. दोघांमध्ये जुनी मैत्रीही पाहायला मिळाली नाही.


फायनलच्या दरम्यान पावसामुळे खेळावर थोडा परिणाम झाला. जेव्हा पाऊस सुरू होता तेव्हा दोघेही जवळ होते मात्र त्यांच्यात कोणतीही बातचीत झाली नाही.

Comments
Add Comment

IPL मिनी लिलाव, कॅमरून ग्रीनचा २५.२० कोटींमध्ये KKRमध्ये समावेश

अबुधाबी : आयपीएल २०२६ साठी अबुधाबी येथे सुरू असलेल्या मिनी लिलावात क्रिकेटपटूंच्या खरेदीसाठी मोठमोठ्या बोली

मेस्सीला न भेटता अनुष्का आणि विराट कोहली महाराजांच्या भेटीला

वृंदावन : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी नुकतीच वृंदावनमधील प्रसिद्ध

आयपीएलचा संपूर्ण लिलाव कधी, कुठे आणि केव्हा? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : आयपीएलचा लिलाव आता फक्त काही तासांवर येऊन ठेपला आहे. या लिलावासाठी आयपीएलच्या चाहत्यांमध्ये

बुमराह परतणार पण अक्षर पटेल नाही खेळणार, टीम इंडिया चिंतेत

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला

फक्त ९५ चेंडूत १७१ धावा करणारा वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही

मुंबई : भारताच्या वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत यूएई विरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. ही

धरमशाला टी ट्वेंटी सामन्यात भारताचा विजय, मालिकेत घेतली आघाडी

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला