Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड शहरातील एका भीषण अपघातामुळे (Accident) महामार्ग असो वा राज्य रस्ता, गतीमर्यादा ओलांडणे, ड्रंक अँड ड्राईव्ह, बेफाम ओव्हरटेक किंवा रस्त्यांची दयनीय अवस्था या सगळ्या कारणांनी अपघातांचे प्रमाण वाढत आहे. मुखेड शहरात सोमवारी एक विचित्र अपघात घडला. ट्रकचा अचानक ब्रेक फेल झाल्याने वाहनाचा ताबा सुटला आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना धडक बसली. या घटनेत तब्बल ७ ते ८ जण जखमी झाले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. सर्व गंभीर जखमींना तातडीने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताची सविस्तर चौकशी सुरू केली आहे. ट्रकचा ब्रेक फेल होण्यामागचं खरं कारण नेमकं काय हे तपासात स्पष्ट होणार आहे.



मुखेडच्या बाराहाळी नाक्यावर ट्रकचा ब्रेक फेल


नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहरातील बाराहाळी नाका परिसरात सोमवारी दुपारी भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकचे ब्रेक अचानक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका काळ्या-पिवळ्या जीपला ट्रकने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की जीप जागेवरच पलटी झाली. याचबरोबर ट्रकने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या तब्बल ५ ते ६ मोटरसायकल चिरडल्या. या भीषण अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ निर्माण झाली. घटनेत एकूण ७ ते ८ जण जखमी झाले असून त्यांना तातडीने मुखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.


अपघातानंतर काही काळ बाराहाळी नाका परिसरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या या अपघाताचा अधिक तपास सुरू असून ट्रकचा ब्रेक फेल होण्यामागचं नेमकं कारण शोधले जात आहे.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis Cabinet Mumbai : पाचव्या वित्त आयोगाला मुदतवाढ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटचे ५ महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (मंगळवार) राज्य मंत्रिमंडळाची (Cabinet) महत्त्वपूर्ण

Delhi Bomb Blast : दिल्ली स्फोटानंतर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिराच्या सुरक्षेत वाढ; सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त

पुणे : भारताची राजधानी दिल्लीमध्ये (New Delhi)  सोमवारी, १० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी झालेल्या दोन बॉम्बस्फोटांमुळे (Bomb

क्रिकेटच्या वादातून गोळीबारात तरुणाचा मृत्यू

जळगाव : शहरातील कांचन नगरातील विलास चौकात क्रिकेटच्या वादातून झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला. आकाश

पुण्यातून २०६ किमी लांबीचा सहापदरी महामार्गाचा प्रस्ताव

पुणे : पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी सरकारनं नवा प्रकल्प हातात घेतलाय. सहापदरी रस्त्याचा हा

ठोंबरे आणि मिटकरींना पक्षातून 'दे धक्का', प्रवक्ते पदावरून उचलबांगडी!

सूरज चव्हाण यांना मात्र 'अभय'; राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत वादाला नवे वळण मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस

इमारतीला आग, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

सांगली : विटा शहरात एका तीन मजली इमारतीला आग लागली. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या स्टील फर्निचरच्या दुकानातून