मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर


मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा अखेर मुहूर्त सापडल्याने मुंबई ते कोकण हा प्रवास आता सुकर होणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर रो-रो फेरीसेवा सुरू होण्याची शक्यता असल्याने कोकणवासीयांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. मुंबई ते कोकण यादरम्यान प्रवासी व वाहनांसाठीची रो-रो फेरीसेवा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू करण्याची तयारी सुरू असून, सागरी महामंडळाने कंबर कसली आहे.


काही महिन्यांपासून केंद्र व राज्यस्तरीय परवानग्या, हवामान अडथळे आणि तांत्रिक कारणांमुळे ही सेवा वारंवार पुढे ढकलली जात होती. गणेशोत्सवात ही सेवा सुरू होईल, अशाप्रकारे नियोजन सुरू होते, मात्र आता सर्व परवानग्या मिळाल्या असून, समुद्रस्थितीही अनुकूल होत आहे. .


सागरी महामंडळाने बोटीची सेवा सुरुवात करण्यासाठी तांत्रिक व प्रशासनिक तयारी पूर्ण केली आहे. जेट्टीवर प्रवाशांसाठी बैठकीची सोय, वाहनांसाठी स्वतंत्र लोडिंग-विचार केंद्र, तसेच सुरक्षित उतार व चढाव यासाठी योग्य उपाययोजना केली जात आहे. जयगड आणि विजयदुर्ग येथे जेट्टीवरून शहरात जाण्यासाठी बस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच हवामान अहवालावर नजर ठेवून समुद्रस्थिती अनुकूल असल्यास ताबडतोब सेवा सुरू करण्याचे प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे. सणासुदीच्या काळात हजारो प्रवासी कोकणात आपल्या गावी जाण्यास निघतात. महामार्गावर तासनतास होणारी वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका, रेल्वेत तिकिटासाठीची धावपळ यामुळे प्रवास त्रासदायक ठरत होता. रो-रो सेवेमुळे सुरक्षित, जलद व आरामदायी प्रवासाचा पर्याय मिळणार आहे. गणेशोत्सवात सेवा न मिळाल्याने नाराजी होती, पण नवरात्रोत्सवात ही सेवा सुरू होणार असल्याचे ऐकून आम्हाला आनंद झाला आहे. मुंबई ते कोकण प्रवासाला नवा पर्याय मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.


काही महिन्यांपासून केंद्र व राज्यस्तरीय परवानग्या, हवामान अडथळे व तांत्रिक कारणांमुळे ही सेवा वारंवार पुढे ढकलली जात होती. गणेशोत्सवात ही सेवा सुरू होईल, अशाप्रकारे नियोजन सुरू होते. तेव्हा तांत्रिक कारणांमुळे ही सेवा सुरू झाली नाही. आता सर्व आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या असून हवामानही स्थिर आहे.


सेवा कशी असेल?


भाऊचा धक्का (मुंबई) येथून जयगड आणि विजयदुर्गपर्यंत या बोटी धावणार आहेत.
प्रवास वेळ : मुंबई - रत्नागिरी ३ ते ३.५ तास, मुंबई-सिंधुदुर्ग ५ तास
वेग : २५ नॉट्स दक्षिण आशियातील सर्वात वेगवान प्रवासी बोट


यशस्वी चाचणी
मुंबई ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग मार्गावर रो-रो सेवेची प्रायोगिक चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. वेग, प्रवासी क्षमता व सुरक्षा तपासणी समाधानकारक ठरली असून, सागरी सुरक्षा यंत्रणांकडूनही हिरवा कंदील मिळाला आहे.


आसन क्षमता
५५२ प्रवासी (इकोनॉमी )
४४ (प्रीमियम इकोनॉमी)
४८ (बिझनेस)
१२ (फर्स्ट क्लास)


वाहन क्षमता
५० चारचाकी व ३० दुचाकी


तिकीटदर




  • इकोनॉमी - २,५०० रु.

  • प्रीमियम इकोनॉमी - ४,००० रु.

  • बिझनेस - ७,५०० रु.

  • फर्स्ट क्लास - ९००० रु.

  • वाहनांचे दर

  • चारचाकी - ६००० रु.

  • दुचाकी - १००० रु.

  • सायकल - ६०० रु.

  • मिनी बस - १३,००० रु

Comments
Add Comment

उन्नती, प्रगती, विकासासाठी मुंबईवर महायुतीचा भगवा फडकलाच पाहिजे!

भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचे महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन मुंबई (खास प्रतिनिधी) :

विश्वचषक विजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षकांचाही राज्य सरकारकडून विशेष गौरव! जेमिमा, स्मृती आणि राधा यादव यांना प्रत्येकी २.२५ कोटी!

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ जिंकून देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

दादरच्या 'स्टार मॉल'मध्ये भयंकर आग!

सेनाभवनसमोर असलेल्या मॉलमध्ये मॅकडोनाल्ड्सच्या किचनमध्ये आग! मुंबई : दादर पश्चिम येथील गजबजलेल्या स्टार

मेट्रो प्रवाश्यांसाठी महत्वाची बातमी ! राज्य सरकार दरवाढीच्या तयारीत

मुंबई : रेल्वे प्रमाणे मेट्रोलाही मुंबईकरांच्या जीवनात महत्वाचे स्थान आहे. मुंबईत २०१४ पासून सुरू झालेले

कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत

मुंबई : आपल्या कीर्तनातून समाजप्रबोधन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदुरीकर

मानखुर्द, गोवंडी, शिवाजीनगर, चेंबूरमधील नागरिकांना धो धो पाणी, चेंबूर अमर महल ते ट्रॉम्बे जलाशय जलबोगदा महिना अखेर होणार कार्यान्वित

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या चेंबूर अमर महल ते ट्रॉम्बे जलशयापर्यंतच्या