World Athletics Championships 2025 : नीरज चोप्रा अजिंक्यपद कायम राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार

टोकियो : भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा आपले विजेतेपद कायम राखण्याच्या उद्देशानेच जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये उतरणार आहे. नीरज पात्रता फेरीपासून आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. या स्पर्धेत नीरजसाठी सर्वात मोठे आव्हान पाकिस्तानचा अर्शद नदीम आणि जर्मनीचा ज्युलियन वेबरचे असणार. नदीमने गेल्या वर्षी पॅरिस ऑलिंपिकमध्ये नीरजला मागे टाकत सुवर्णपदक जिंकले होते. तर वेबरने अलीकडेच डायमंड लीगचे विजेतेपद जिंकले होते.


जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत नीरजचे ध्येय सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकण्याचे असणार आहे. आणि अशी कामगिरी करणारा तिसरा भालाफेकपटू बनण्यावर त्याचे लक्ष्य असेल. टोकियो ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्या नीरजने २०२३ मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. चेक प्रजासत्ताकचा दिग्गज आणि सध्या नीरजचे प्रशिक्षक जान झेलेंजी (१९९३, १९९५) आणि ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स (२०१९, २०२२) हे एकमेव खेळाडू आहेत ज्यांनी आतापर्यंत सलग दोन वेळा जागतिक अजिंक्यपद पटकावले आहे.


२०२४ च्या पॅरिस ऑलिंपिकनंतर नीरज पहिल्यांदाच पाकिस्तानच्या नदीमशी सामना करणार आहे. त्याला फ्रान्सच्या राजधानीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या कामगिरीचा बदला घेण्याची संधी मिळेल. नदीमने पॅरिसमध्ये ९२.९७ मीटरच्या शानदार फेकसह सुवर्णपदक जिंकले होते. तर नीरजचा त्या दिवशीचा सर्वोत्तम फेक ८९.४५ मीटर होता आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना पात्रता फेरीत दोन वेगवेगळ्या गटात ठेवण्यात आले असल्याने नीरज आणि नदीम स्पर्धा करणार नाहीत. गुरुवारी अंतिम फेरीत ते एकमेकांसमोर येण्याची अपेक्षा आहे. वेबर, पीटर्स, २०१५ चा विश्वविजेता केनियाचा ज्युलियस येगो, २०१२ चा ऑलिंपिक विजेता त्रिनिदाद आणि टोबॅगोचा केशॉर्न वॉलकॉट, चेक प्रजासत्ताकचा अनुभवी जाकुब वडलेजच आणि ब्राझीलचा लुईझ दा सिल्वा हे उर्वरित भालाफेकपटू आहेत.


भारतासाठी ही एक ऐतिहासिक स्पर्धा असेल कारण सचिन यादव, यशवीर सिंग आणि रोहित यादव नीरजसोबत मैदानावर उतरणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशांमधील ही सर्वात मोठी भालाफेकपटूंची संख्या आहे. नीरजला गतविजेता म्हणून वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आला आहे. तर इतर तिघांनी जागतिक क्रमवारीतून पात्रता मिळवली आहे. १९ सदस्यीय गट अ पात्रता फेरीत नीरजला वेबर, वॉलकॉट, वॅडलेझ आणि सचिनसह स्थान देण्यात आले आहे, तर १८ सदस्यीय गट ब मध्ये नदीम, पीटर्स, येगो, दा सिल्वा, रोहित, यशवीर आणि उदयोन्मुख श्रीलंकेचा रमेश थरंगा पाथिराज यांचा समावेश आहे. ८४.५० मीटर अंतर गाठणारे किंवा सर्वोत्तम १२ भालाफेकपटू गुरुवारी अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.

Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या