मोदींच्या वाढदिवशी ५० हजार ज्येष्ठ नागरिकांना मिळणार गिफ्ट


दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची मोठी घोषणा


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिल्लीतील ५० हजार ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन योजनेशी जोडले जाणार आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता मांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. रविवारी (१४ सप्टेंबर) जाहीर झालेल्या ३ कल्याणकारी योजनांविषयी रेखा गुप्ता यांनी माहिती दिली.


योजनेशी जोडले जाण्याकरीता पेन्शनधारकांना ई-जिल्हा पोर्टलद्वारे अर्ज सादर करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. पेन्शन योजनेतील लाभाथ्यांची निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर केली जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सर्व पात्र ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना या योजनेचा लाभघेण्यासाठी तत्काळ अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.


चालू आर्थिकवर्षांमध्ये या योजनेसाठी तब्बल १४९ कोटी रुपयांचे बजेट वाटप करण्यात आले असल्याचे रेखा गुप्ता यांनी सांगितले. नव्या पेन्शन योजनेमुळे ५० हजार ज्येष्ठ नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक दिलासा मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे जीवन सन्मानाने जगता यावे यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असे मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या. भविष्यात लाभाष्यांची संख्या वाढली आणि अतिरिक्त निधीची आवश्यकता भासली, तर सरकार विलंब न करताअतिरिक्त अर्थसंकल्पीय मदत करेल असे आश्वासनही त्यांनी दिली.


दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय भाषणामध्ये पेन्शन योजनेशी संबंधित घोषणा केली होती. ६० ते ६९ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक मदत २००० रुपयांवरून २,५०० रुपये करण्यात येत आहे आणि आणि ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना २,५०० रुपयांवरून ३,००० रुपये करण्यात येत आहे असे त्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात म्हटले होते.


Comments
Add Comment

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे

पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त महिलांना दिली खास भेट; सुरु केले 'हे' नवे अभियान

धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा

भारत धमक्यांना घाबरत नाही, घरात घुसून मारतो - पंतप्रधान मोदी

भोपाळ : “हा नवा भारत आहे, तो कोणत्याही अणुबॉम्बच्या धमक्यांपासून घाबरत नाही. हा नवा भारत घरात घुसून मारतो,” असे