युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब


नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे. युवराजला २३ सप्टेंबर रोजी दिल्लीच्या ईडी मुख्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे युवराजच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ईडीने वन एक्स बेट या बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप प्रकरणात माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा , बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांनाही समन्स बजावले आहे. रॉबिनला २२ सप्टेंबर, युवराजला २३ सप्टेंबर, तर सोनू सूदला २४ सप्टेंबर रोजी ईडीच्या दिल्लीतील मुख्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. याआधी क्रिकेटपटू शिखर धवन, सुरेश रैना, अभिनेत्री उर्वीशी रौतेला यांची बेटिंग अ‍ॅप प्रकरणात ईडीने चौकशी केली आहे.


ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1xBet, फेअरप्ले, पॅरीमॅच आणि लोटस365 यासारख्या बंदी घातलेल्या बेटिंग प्लॅटफॉर्मशी असलेल्या प्रचारात्मक संबंधांच्या चौकशीचा भाग म्हणून क्रिकेटपटू आणि कलाकारांची चौकशी करण्यात आली आहे. गुंतवणूकदार आणि जनतेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात कर चुकवल्याच्या आरोपाखाली बेकायदेशीर सट्टेबाजीची चौकशी ईडी करत आहे. पैशांची अफरातफर झाली आहे का ? याचाही तपास ईडी करत आहे.


Comments
Add Comment

आयसीसी क्रमवारीत भारतीय महिलांचा डंका

शफाली, रेणुकाची झेप; दीप्तीचा 'नंबर १' कायम नवी दिल्ली: आयसीसीच्या ताज्या महिला टी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी

विराटसाठी २८ हजार धावांचा टप्पा हाकेच्या अंतरावर

सचिन-संगकाराच्या क्लबमध्ये एन्ट्रीसाठी २५ धावांची गरज मुंबई : भारतीय क्रिकेटचा 'किंग' विराट कोहली पुन्हा एकदा

भारताचे मिशन ‘क्लीन स्वीप’ यशस्वी

हरमनप्रीतच्या ६८ धावा; मालिका ५-० ने खिशात तिरुवनंतपुरम : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२०

टी-२० सामन्यात सोनम येशेचा ८ बळींचा जागतिक विक्रम

भूतानच्या फिरकीपटूने म्यानमारविरुद्ध रचला इतिहास; ४ षटकांत दिल्या ७ धावा भूतान : फिरकीपटू सोनम येशे याने इतिहास

न्यूझीलंडविरुद्ध वनडेतून ३ स्टार खेळाडूंचा पत्ता कट ? दिग्गजांचं कमबॅक ?

मुंबई : जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करणार

गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक

नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम राहील. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट