मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन !

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. आज दुपारी २ ते ३ या कालावधीत, भातनजवळील एक किलोमीटरच्या परिसरात वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे.


ही वाहतूक बंदी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (MSEDCL) मार्फत करण्यात येणाऱ्या २२ केव्ही वीजवाहिन्यांच्या देखभाल आणि फिडर बसवण्याच्या कामासाठी लागू केली आहे.


वाहतूक बंद असलेला भाग:


मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील कि.मी. ९.६०० ते ९.७०० दरम्यान दोन्ही दिशांनी (मुंबईहून पुण्याकडे व पुण्याहून मुंबईकडे) सर्व प्रकारच्या वाहनांची (हलकी व अवजड) वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे.


पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे:


मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी – कळंबोली सर्कल (पळस्पे) किंवा शेडुंग एक्झिटवरून राष्ट्रीय महामार्ग ४८ (NH-४८) वर वळवले जाईल.


NH-४८ वरून पुढे खालापूर टोल नाका किंवा मॅजिक पॉईंट येथे पुन्हा एक्स्प्रेस वेवर प्रवेश करता येईल.


पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी – खोपोली एक्झिट किंवा खालापूर टोल नाक्याजवळून पाली ब्रीज मार्गे NH-४८ वर वळवले जाईल.


पोलीस यंत्रणा सज्ज असून, काम पूर्ण होताच वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


पुण्यातील सहा प्रमुख रस्त्यांवर पे अँड पार्क योजनेची अंमलबजावणी


वरील पर्यायी मार्गांचा वापर करून राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरून प्रवास करणारी वाहने खालापूर टोल नाका आणि मॅजिक पॉइंट येथून पुन्हा द्रुतगती महामार्गावर प्रवेश करू शकतात. हे काम पूर्ण होईपर्यंत ही वाहतूक अधिसूचना अंमलात राहील. अशी माहिती अप्पर पोलिस महासंचालक वाहतूक विभाग यांच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान दुपारी ३ नंतर काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत केली जाईल.

Comments
Add Comment

या उद्योगपतीने घेतली पहिली टेस्ला !

मुंबई : आयनॉक्स ग्रुपचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ जैन हे भारतातील पहिले उद्योगपती ठरले आहेत, ज्यांनी ‘इंडिया

मुंबईकरांना दिलासा ! मुंबईत ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू – प्रवास होणार स्वस्त आणि सुलभ

मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सोयीस्कर होणार आहे . शहरात आता इलेक्ट्रिक बाईक

मुंबई मेट्रो-३ च्या वेळापत्रकात १५ सप्टेंबरपासून बदल

मुंबई : मुंबई मेट्रो-३ या शहरातील अॅक्वा लाईनने नुकतेच सुधारित सेवा वेळापत्रक जाहीर केले आहे. आज सोमवारपासून

दिवाळीनिमित्त जादा बसगाड्या सोडणार

मुंबई : दसरा दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे राज्यभरात

'दशावतार' सिनेमा पाहिल्यावर काय म्हणाले राज ठाकरे? पाहा Video

मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या सिनेमाघरांमध्ये दशावतार या सिनेमाची चर्चा सुरू आहे. दशावतार सिनेमा

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच