Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत एक दिवसाने वाढवण्यात आली आहे. आता करदात्यांना 15 सप्टेंबरऐवजी 16 सप्टेंबर 2025 पर्यंत त्यांचे रिटर्न दाखल करता येणार आहेत.

ही मुदतवाढ 15 सप्टेंबर रोजी अनेक करदात्यांना ई-फायलिंग पोर्टलवर तांत्रिक अडचणी आणि प्रचंड ट्रॅफिकचा सामना करावा लागल्यामुळे देण्यात आली आहे. यामुळे लाखो लोकांना शेवटच्या दिवशी रिटर्न भरण्यात अडचणी येत होत्या. अनेक चार्टर्ड अकाउंटंट आणि करदात्यांनी सोशल मीडियावर याबद्दल तक्रारी केल्या होत्या.

या तक्रारींची दखल घेऊन, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) रिटर्न भरण्याची अंतिम तारीख एक दिवसाने वाढवण्याचा निर्णय घेतला. याबाबतची माहिती आयकर विभागाने त्यांच्या अधिकृत 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर दिली आहे.

 



या निर्णयामुळे ज्या करदात्यांनी अद्याप आपले रिटर्न भरले नाहीत, त्यांना आता विलंब शुल्क आणि दंडापासून वाचण्यासाठी आणखी एक दिवस मिळाला आहे. करदात्यांनी 16 सप्टेंबर 2025 पर्यंत आपले रिटर्न दाखल करणे आवश्यक आहे.
Comments
Add Comment

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : नियतीचा खेळ अथांग आणि अतिशय निष्ठूर असतो, याचाच प्रत्यय आणून देणारी एक दुःखद घटना मुंबईतील भांडुप

12th BRICS Meeting : नवी दिल्लीत आज १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक; हवामान बदल आणि पर्यावरणीय सहकार्यावर होणार मंथन

नवी दिल्ली : भारताच्या BRICS अध्यक्षतेअंतर्गत १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात

Gwalior Accident : मध्य प्रदेशात भीषण अपघात; मजुरांच्या वाहनाला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू

Pritesh Walia : भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया अमेरिकेत ICEच्या ताब्यातून जामिनावर मुक्त

नवी दिल्ली :  भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात तब्बल 14 दिवस राहिल्यानंतर

Jharkhand Students Protest : 24 दिवसांच्या आंदोलनानंतर झारखंड सरकारचा मोठा निर्णय; JSSC-CGL परीक्षा रद्द

झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री

Plastic Waste : भारतापुढे दररोज १९ हजार टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान

नवी दिल्ली : दुधाची पाकिटे, चिप्सची वेष्टणे आणि ऑनलाइन खरेदीचे पॅकेजिंग यामुळे देशात दररोज सुमारे १९ हजार टन