Pune Crime News : नोटीस फाडली, पोलिसांवर कुत्र्यांचा हल्ला, वादग्रस्त IAS अधिकारी खेडकर कुटुंबाचा खतरनाक खेळ उघडकीस

पुणे : बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरावर पुन्हा एकदा पोलिसांनी नोटीस लावली आहे. पोलिस तपासासाठी सहकार्य केले नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. मात्र, नोटीस देण्यासाठी गेलेल्या पोलिसांना यावेळी भयंकर अनुभवाला सामोरं जावं लागलं. नोटीस स्वीकारण्याऐवजी पोलिसांच्या अंगावर थेट कुत्रे सोडण्यात आले. इतकंच नव्हे तर घरावर लावलेली पोलिसांची अधिकृत नोटीस देखील फाडण्यात आली. त्यामुळे पोलिसांची कारवाई अधिक कठीण झाली. या घटनेनंतर पोलिसांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, जर पूजा खेडकर यांनी सहकार्य केले नाही, तर त्यांना थेट ताब्यात घेण्यात येईल. या नाट्यमय प्रसंगामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पूजा खेडकर यांच्या आईविरुद्ध गुन्हा नोंद!


वादग्रस्त बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. पुणे शहर पोलिसांनी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्याविरुद्ध थेट गुन्हा दाखल केला आहे. चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, मनोरमा खेडकर यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम २२१ अंतर्गत शासकीय कामात अडथळा आणणे, कलम २३८ अंतर्गत गुन्ह्याचे पुरावे नष्ट करणे किंवा चुकीची माहिती देऊन आरोपींना वाचवणे तसेच कलम २६३ अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खेडकर कुटुंबावरील कायदेशीर संकट अधिकच गडद झालं असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


रोड रेज प्रकरणाशी थेट संबंध!


नवी मुंबईतील रोड रेज प्रकरणाने आता पुण्यातील खेडकर कुटुंबाच्या अडचणी वाढवल्या आहेत. या प्रकरणात दोन अज्ञात व्यक्तींनी ट्रक ड्रायव्हरच्या मदतनीसाचे अपहरण करून त्याला थेट मनोरमा खेडकर यांच्या घरी आणल्याची माहिती समोर आली आहे. तपासाची सूत्रे गवसल्यावर नवी मुंबई पोलिसांनी त्या घराचा शोध घेतला आणि घटनास्थळी धडक दिली. मात्र, पोलिसांचा गंभीर आरोप असा आहे की, मनोरमा खेडकर यांनी पोलिसांना घरात प्रवेश करण्यास विरोध केला आणि आरोपीला पळून जाण्यास मदत करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणामुळे खेडकर कुटुंबाविरोधातील गुन्ह्यांचे जाळे आणखी गुंतागुंतीचे झाले असून, पुढील चौकशीत नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.


खेडकर कुटुंब अडचणीत! वडिलांवर गंभीर आरोप


आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाभोवती वादांची मालिका वाढतच चालली आहे. यावेळी पूजाचे वडील दिलीप खेडकर यांचे नाव थेट चालकाच्या अपहरणाच्या प्रकरणाशी जोडले गेले आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, दिलीप खेडकर यांना अटक करण्यासाठी पथक त्यांच्या घरी पोहोचले असता, पूजाची आई मनोरमा खेडकर यांनीच त्यांना पळून जाण्यास मदत केली. या घटनेनंतर पोलिसांनी दिलीप खेडकर यांचा शोध अधिक तीव्र केला असून, त्यांना लवकरच गजाआड करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, पूजा खेडकर स्वतः एका मागोमाग एका वादात सापडत असताना, त्यांच्या कुटुंबियांचाही गुन्हेगारी प्रकरणांशी संबंध आल्याने प्रकरण अधिकच धक्कादायक स्वरूप धारण करत आहे. खेडकर कुटुंबाविरुद्ध होत असलेले हे गंभीर आरोप आणि सतत समोर येणारे नवे खुलासे यामुळे राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे.
Comments
Add Comment

Ladki Bahin Yojana : 'हा' तर लाडका निघाला ! अहिल्यानगरात ५२३ पुरुषांनी लाटले ७४.७५ लाख

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने राज्यातील गरजू महिलांसाठी सुरु केलेली लाडकी बहीण योजना अनेक महिलांसाठी मोठा आधार देणारी

Minister Nitin Gadkari : जळगाव बायपास प्रकरणी मोठी कारवाई ! नितीन गडकरींचे चौकशीचे आदेश, दोषी ठेकेदार होणार ब्लॅकलिस्ट

Minister Nitin Gadkari : सुरत–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Surat–Nagpur National Highway) पाळधी ते तरसोद बायपासच्या रेल्वे उड्डाणपूलाच्या

Radhakrishna Vikhe-Patil : मराठा जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर सरकार अलर्ट! ‘जाणीवपूर्वक गैरप्रकार आढळल्यास कारवाई करू’ : राधाकृष्ण विखे-पाटील

संगमनेर : मराठा जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या काही घटनांवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा

State Government : राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण

अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी आर्थिक मदत; वैद्यकीय उपचारासाठी १ लाखांपर्यंतचे कवच मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या

Jalgaon : दोघांचा अपघातात तर एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू , एकाच दिवशी तीन दुर्दैवी घटना घडल्याने जळगाव जिल्हा हळहळला

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात बुधवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांनी जिल्हा हळहळला आहे. घडलेल्या दुर्घटनांमध्ये

Pratap Sarnaik : १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल मुंबई : "