Tuljabhavani VIP Darshan: तुळजाभवानी देवीचं व्हीआयपी दर्शन होणार महाग!

सोलापूर: शारदीय नवरात्रोत्सव (Navratri 2025) अवघ्या १० दिवसांवर आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी सुरू आहे. दरम्यान, तुळजाभवानी देवीच्या व्हीआयपी दर्शनाच्या पासच्या किंमतीत वाढ (VIP Darshan Pass fare) करण्यात आली आहे. व्हीआयपी दर्शन पासच्या दरात वाढ करण्याच्या निर्णयाची माहिती तुळजाभवानी मंदिर संस्थानने दिली आहे. व्हीआयपी पासचे नवे दर २० सप्टेंबरपासून लागू करण्यात येणार आहेत. ऐन नवरात्रोत्सवाच्या आधी ही दरवाढ झाल्याने भाविकांना व्हीआयपी दर्शनासाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

तुळजाभवानी मंदिर संस्थानाने एक परिपत्रक काढून या दरवाढीची अधिकृत घोषणा केली आहे. देणगी दर्शन पास आणि स्पेशल गेस्ट रेफरल पासच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. याआधी देणगी दर्शन पास २०० रुपयांना मिळत असे. यापुढे हा देणगी दर्शन पास ३०० रुपयांना मिळणार आहे. तर ५०० रुपयांना मिळणाऱ्या देणगी दर्शन पासची किंमत थेट दुप्पट केली असून तो १ हजार रुपयांना मिळणार आहे. स्पेशल गेस्ट रेफरल पास हा महत्त्वाच्या व्यक्तींसाठी असलेला पास आहे. तो याआधी २०० रुपयांना होता. पण आता त्यासाठी ५०० रुपये आकारले जातील.
Comments
Add Comment

पारंपरिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ

मुंबई : भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रॅन्ड प्राडा, लिडकॉम (संत

पाकिस्तानच्या संसदेत सभापतींना रोख रक्कम मिळाली, १२ खासदारांनी १० नोटांसाठी उड्या मारल्या

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत एक अजब घटना घडली. या घटनेवर हसावे की पाकिस्तानच्या खासदारांच्या

प्रकाश महाजन भाजपच्या वाटेवर? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

नागपूर : मनसेतून नुकतेच बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतासाठी २०२५ वर्ष सर्वात उष्ण ठरणार?

नवी दिल्ली : जगभरातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. बदलत्या हवामानाचा मोठा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे.

राज्यात भीक मागणे हा गंभीर गुन्हा होणार

नागपूर : महाराष्ट्रात भीक मागण्यावर प्रतिबंध घालणारे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले.

बिबट्यांना पकडण्यासाठी ३० गावांत ५१ पिंजरे

निरगुडसर  : बिबट्यांना पकडण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील मंचर वनक्षेत्रात असलेल्या चार परिमंडळातील एकूण ५५