दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१ वाजता गुवाहाटीमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ५.८ रिश्टर स्केलवर नोंदवली गेली आहे. आसाम व्यतिरिक्त, या भूकंपाचे धक्के भुटान आणि पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील भागांमध्ये देखील जाणवले. भूकंपामुळे लोकांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण दिसून आले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्रस्थान आसाममधीलच उदलगुडी जिल्ह्यात, जमिनीपासून ५ किलोमीटर खोलीवर नोंदवले गेले. ता भूकंपाचे धक्के भुटान आणि बांगलादेशच्या उत्तरेकडील भागांपर्यंत पोहोचले आहेत. सुदैवाने, या भूकंपात कुणीही जखमी झाल्याची किंवा कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
याआधीही, २ सप्टेंबर २०२५ रोजी, म्हणजे सुमारे दोन आठवड्यांपूर्वी, आसाममधील सोनितपूर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल होती.