अरेरे! १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या वैष्णोदेवी यात्रेला पुन्हा लागला ब्रेक

जम्मू काश्मीर: १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या माता वैष्णोदेवीच्या यात्रेला पुन्हा एकदा पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे तीर्थक्षेत्र मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

वैष्णोदेवीची यात्रा पुढे ढकलली


जम्मू आणि काश्मीरमध्ये हवामान स्वच्छ झाल्यानंतर, लवकरच माता वैष्णोदेवीची यात्रा पुन्हा सुरू होऊ शकेल अशी अपेक्षा होती. परंतु आता पुन्हा एकदा बातमी येत आहे की सततच्या मुसळधार पावसामुळे १४ सप्टेंबरपासून सुरू होणारी यात्रा पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. माता वैष्णोदेवीच्या यात्रेला भवन आणि यात्रा मार्गावरील भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.



'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना बोर्डाने लिहिले की, "जय माता दी. भवन आणि यात्रा मार्गावर सततच्या पावसामुळे, १४ सप्टेंबर (रविवार) पासून सुरू होणारी माता वैष्णोदेवी यात्रा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. भाविकांना पुढील अधिकृत आदेशाची वाट पाहण्याची विनंती आहे."

यात्रा १४ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार होती


१२ सप्टेंबर रोजी माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाने त्यांच्या अधिकृत 'X' हँडलद्वारे १४ सप्टेंबरपासून वैष्णोदेवी यात्रा पुन्हा सुरू होत असल्याची माहिती दिली होती. श्राइन बोर्डने लिहिले होते की, "जय माता दी. हवामान अनुकूल राहिल्यास वैष्णो देवी यात्रा १४ सप्टेंबर (रविवार) पासून पुन्हा सुरू होईल. तपशील-बुकिंगसाठी, कृपया "Maa Vaishno Devi.org" ला भेट द्या.

खराब हवामानामुळे २६ ऑगस्टपासून यात्रा बंद


खरं तर २६ ऑगस्टपासून ही यात्रा बंद करण्यात आली आहे. कारण त्या दिवशी जम्मूत अत्यंत खराब हवामानादरम्यान माता वैष्णो देवी मंदिर मार्गावर भूस्खलन झाल्यामुळे ३५ हून अधिक यात्रेकरूंना आपला जीव गमवावा लागला होता आणि १० हून अधिक लोक जखमी झाले होते. यामुळे, माता वैष्णो देवी यात्रा पुढे ढकलण्यात आली. गेल्या काही दिवसांत कटरा येथे झालेल्या भूस्खलनानंतर प्रशासनाने हॉटेल्स आणि धर्मशाळा रिकामी करण्याचे आदेश जारी केले होते. त्यानंतर हवामान यात्रेसाठी अनुकूल झाल्यानंतर ही यात्रा १४ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू करत असल्याची आनंद वार्ता बोर्डाने भाविकांना दिली होती. मात्र पुन्हा हवामान खराब झाल्यामुळे श्राइन बोर्डाने वैष्णोदेवी यात्रा काळी काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

 
Comments
Add Comment

तणाव वाढला, तैवान जवळ पोहोचला चिनी विमानांचा आणि जहाजांचा ताफा

तैपेई : चीन आणि तैवान यांच्यातील तणाव वाढू लागला आहे. चिनी विमानांचा आणि जहाजांचा ताफा तैवान जवळ पोहोचू लागला

ठाणे पोलिसांनी ज्येष्ठांसाठी विकसित केला ‘आधारवड’ मोबाइल अॅप

ठाणे : ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या

सुबोध भावे साकारणार निम करोली बाबा

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेता सुबोध भावे आता हिंदी सिनेसृष्टीत एक मोठी झेप घेत आहे. तो लवकरच येणाऱ्या

५८ दिवसांच्या स्मरणकोषाचे नाट्य...!

५८ दिवसांच्या स्मरणकोषाचे नाट्य...! महाभारत या महाकाव्याच्या संदर्भाने सांगायचे तर, दक्षिणायन व उत्तरायण यात

सोलापूर विभागात पहिली ‘कवच’ चाचणी यशस्वी

मुंबई : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी रविवारी सोलापूर विभागात ‘कवच’ प्रणालीच्या यशस्वी लोको

शेअर बाजारातील प्राथमिक मार्केट...

डॉ. सर्वेश सुहास सोमण आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे खासगीरीत्या आयोजित