आतापर्यंत ६ कोटी लोकांनी ITR भरला आयकर विभाग म्हणाले, 'आतापर्यंत.....

प्रतिनिधी:कर निर्धारण वर्ष (Income Tax Assesment Year) २०२५-२६ साठी आतापर्यंत सहा कोटींहून अधिक आयकर विवरणपत्रे (ITR Filings) दाखल करण्यात आली आहेत असे नेमक्या शब्दात आयकर विभागाने आज सांगितले आहे. दंडाशिवाय आ यटीआर दाखल करण्याची शेवटची मुदत १५ सप्टेंबर आहे. 'आतापर्यंत आणि अजूनही ६ कोटी आयकर विवरणपत्रे (आयटीआर) चा टप्पा गाठण्यात आम्हाला मदत केल्याबद्दल करदात्यांना आणि कर व्यावसायिकांचे आभार' असे आयकर विभागाने एक्सवरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.करदात्यांना आयटीआर दाखल करणे, कर भरणे आणि इतर संबंधित सेवांमध्ये मदत करण्यासाठी, आमचे हेल्पडेस्क २४x७ कार्यरत आहे आणि विभाग कॉल, लाईव्ह चॅट, वेबएक्स सत्रे आणि ट्विटर/एक्स द्वारे मदत पुरवत आहे, असेही पुढे त्यात म्हटले आहे.


ज्या करदात्यांनी मूल्यांकन वर्ष (Valuation Year) २०२५-२६ साठी आयटीआर दाखल केला नाही त्यांना शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी लवकरात लवकर आयटीआर दाखल करण्यास आयकर विभागाने सांगितले.आयकर विभागाने मे महिन्यात अ शा व्यक्ती, एचयूएफ (Hindu Undivided Family) आणि संस्थांना त्यांच्या खात्यांचे ऑडिट करण्याची आवश्यकता नसलेल्या व्यक्ती, एचयूएफ आणि संस्थांसाठी कर असेसमेंट (निर्धारण) वर्ष २०२५-२६ (आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये मिळवलेल्या उत्पन्नासाठी ) साठी आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै ते १५ सप्टेंबरपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे.


आयकर रिटर्न (आयटीआर) फॉर्ममधील 'स्ट्रक्चरल आणि कंटेंट रिव्हिजन' मुळे ही मुदतवाढ देण्यात आली, जी एप्रिलच्या अखेरीस आणि मेच्या सुरुवातीला अधिसूचित करण्यात आली होती. २०२५-२६ मूल्यांकन वर्षासाठी आयटीआर फॉर्ममध्ये केलेल्या बदलां साठी आयटीआर फाइलिंग युटिलिटीज आणि बॅक-एंड सिस्टममध्ये देखील बदल करण्याची आवश्यकता आहे.गेल्या काही वर्षांत आयटीआर फाइलिंगमध्ये सातत्याने वाढ झाली आहे जी वाढती अनुपालन (Compliance) आणि कर जनजागृतीचा विस्ताराचे प्र तिबिंब आहे. २०२४-२५ मूल्यांकन वर्षासाठी ३१ जुलै २०२४ पर्यंत विक्रमी ७.२८ कोटी आयटीआर दाखल करण्यात आले, जे २०२३-२४ मूल्यांकन वर्षातील ६.७७ कोटी होते, इयर ऑन इयर बेसिसवर आयटीआर फायलिंगमध्ये गेल्या वर्षीतील तुलनेत ७.५% वाढ नोंदवते.

Comments
Add Comment

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम — प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय

आगामी अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली 'विकसित भारत २०४७' बैठक संपन्न

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थतज्ज्ञ व रणनीतीकार, निती आयोगाचे सदस्य,

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

KDMC Election 2026 : भाजपने मतदानाआधीच खातं उघडलं कडोंमपात भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध

डोंबिवली : महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या