मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी जाहीर केले. राज्यात तीन हजारांपेक्षा जास्त बारव आहेत, या बारवांचे आणि विहिरींचे स्थापत्यशास्त्र वाखाणण्याजोगे आहे. त्याकाळी केलेले पाण्याचे नियोजन कौतुकास्पद असे आहे. याच कारणामुळे व्यवस्थित नोंदी करुन पुढील नियोजनासाठी राज्यातील सर्व बारव आणि विहिरी यांचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करणार असल्याचे मंत्री ॲड आशिष शेलार यांनी सांगितले.
तज्ज्ञांच्या मदतीने राज्यातील बारव आणि विहिरींच्या पाण्याचे नियोजन करणार असल्याची माहिती मंत्री ॲड आशिष शेलार यांनी दिली. या नियोजनामुळे ज्या काळात पाण्याचे दुर्भिक्ष्य असते त्या काळात पाणी पुरवठा करण्यास स्थानिक पातळीवर मोठी मदत होणार आहे, असे मंत्री ॲड आशिष शेलार म्हणाले. पुढील तीन महिन्यांत महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे प्राथमिक जिल्हानिहाय सर्वेक्षण पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.