आरबीआयकडून फोन पे ला २१ लाखांचा दंड

प्रतिनिधी:आरबीआयने (Reserve Bank of India) फोन पे या आघाडीच्या फिनटेक कंपनीला २१ लाखांचा दंड ठोठावला आहे. शुक्रवारी याबद्दल माहिती आरबीआयने दिली आहे. प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंटस (Prepaid Payments Instruments PPIs) बाबती तले अनुपालन (Regulations) न पाळल्याबाबत कंपनीवर आरबीआयने दंडात्मक कारवाई केली आहे. एका निवेदनात आरबीआयने म्हटले आहे की,'ऑक्टोबर २०२३ ते डिसेंबर २०२४ या कालावधीतील कंपनीच्या कामकाजाच्या संदर्भात मध्यवर्ती बँकेने कंप नीची वैधानिक तपासणी केली.'आरबीआयच्या निर्देशांचे पालन न केल्याच्या पर्यवेक्षी निष्कर्षांवरून आणि या संदर्भात संबंधित पत्राच्या आधारे आरबीआयने फोन पे ला एक नोटीस बजावण्यात आली आहे, ज्यामध्ये निर्देशांचे पालन न केल्याबद्दल दंड का लावू नये याची कारणे दाखवा नोटीस बजावली होती.मात्र कंपनीने नोटीसला दिलेले उत्तर लक्षात घेता फोन पे च्या युक्तिवादानंतरही वैयक्तिक सुनावणीदरम्यान केलेले तोंडी सादरीकरण विचारात घेतल्यानंतर आरबीआयला असे आढळून आले की कंपनीविरुद्धचा आरोप कायम आहे ज्यामुळे आर्थिक दंड आकारण्याची आवश्यकता फोन पे ला आहे.


कंपनीच्या एस्क्रो (Escrow) खात्यातील दिवसाच्या अखेरीस शिल्लक रक्कम थकबाकी असलेल्या पीपीएल आणि व्यापाऱ्यांना काही दिवसांच्या देय रकमेपेक्षा कमी होती आणि कंपनीने आरबीआयला या एस्क्रो खात्यातील कमतरता तात्काळ कळवली नाही.' अ से त्यात म्हटले आहे.आरबीआयने असेही म्हटले आहे की हा दंड नियामक अनुपालनातील त्रुटींवर आधारित आहे आणि कंपनीने तिच्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर (Validation) निर्णय घेण्याचा बँकेचा हेतू नाही.

Comments
Add Comment

अरे बापरे! देशभरात २२ बनावट विद्यापीठे

यूजीसीकडून देशातील २२ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) देशातील २२ बनावट

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मनात नेमकं चाललंय काय? निवृत्ती की राजकीय खेळी?

शिंदे गटाच्या आमदाराच्या निर्णयामागे कुटुंबातील 'नवे नेतृत्व' आणण्याची खेळी? मुंबई : राज्याचे समाजकल्याण

मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरून भांडण! नागपूरचे पोस्टमास्टर जनरलपद नेमके कुणाकडे?

एकीने दुसरीच्या अंगावर पाणी ओतलं, चिमटाही काढला नागपूर : नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या

एल्फिन्स्टन पूल पाडण्यासाठी रेल्वेच्या मंजुरीची प्रतीक्षा, पश्चिम रेल्वेची अवाजवी मागणी!

मुंबई : वरळी-शिवडी उन्नत मार्गाच्या प्रकल्पासाठी एल्फिन्स्टन पुलावरील डांबरी थर काढण्याचे काम पूर्ण झाले असून,