आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ७१८५० कोटींच्या विकासकामांचा शिलान्यास

प्रतिनिधी:आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरात ७१८५० कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत. सरकारच्या अधिकृत माहितीप्रमाणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकूण ७१८५० कोटींच्या विकासकामांचा शिलान्यास करणार आहेत. मिझोराम, मणि पूर, आसाम, पश्चिम बंगाल, बिहार अशा पाच राज्यांच्या विकासकामांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. पंतप्रधान सकाळी मणिपूर दौऱ्यापासून आपल्या विकास कामांची पायाभरणी करतील.माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये ७३ ०० कोटींच्या विकासकामाचे चुराचांदपूर, व मणिपूर अर्बन रोड येथे शिलान्यास करतील. तसेच नॅशनल हायवे प्रोजेक्ट, मणिपूर इन्फोटेक डेव्हलपमेंटचे उद्घाटनही करतील. इंफाळ मध्येही १२०० कोटी रूपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येईल. त्यामुळे आ यटी सेझ, नवीन पोलिस मुख्यालय यांचा समावेश आहे.


मिझोराममध्येही पंतप्रधान विविध ९००० कोटींची विकासकामांचे उद्घाटन ऐझाल (Aizawl) येथे करणार आहेत. रस्ते, रेल्वे, उर्जा, क्रीडा अशा प्रकारच्या क्षेत्रीय विकासकामाची उभारणी पंतप्रधान करतील. बैराबी साईरंग नव्या रेल्वे मार्गाचे उद्घाटनही यावेळी करण्यात येईल. या रेल्वे प्रकल्पात प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ४५ बोगदे, ५५ ब्रीज, ८८ छोटे बोगदे असतील. याशिवाय साईरंग दिल्ली राजधानी एक्सप्रेस, गुवाहाटी एक्स्प्रेस, साईरंग कलकत्ता एक्स्प्रेस इत्यादी गाड्यांना या दरम्यान हिरवा कंदील दा खवला जाईल.


आसाममध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतरत्न डॉ भुपेन हजारिका यांच्या स्मरणार्थ गुवाहाटी येथे पंतप्रधान त्यांची १०० वी जयंती साजरी करतील. याशिवाय आसाममध्ये पंतप्रधानांच्या हस्ते १८५३० कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन होणार आहे. ते दरंग येथेही वि विध प्रकल्पांची पायाभरणी करतील, त्यानंतर गोलाघाट येथील आसाम बायो-इथेनॉल प्रायव्हेट लिमिटेड, नुमालीगड रिफायनरी प्लांटचे उद्घाटन करतील. गोलाघाट येथे पॉलीप्रोपायलीन प्लांटची पायाभरणी देखील करतील. पश्चिम बंगाल येथे १५ सप्टेंबर रोजी, पंत प्रधान मोदी कोलकाता येथे १६ व्या संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्स-२०२५ चे उद्घाटन करणार आहेत. भारताच्या लष्करी तयारीच्या भविष्यातील विकासासाठी पायाभरणी करण्यासाठी सशस्त्र दलांचा हा सर्वोच्च-स्तरीय विचारमंथन मंच आहे.


बिहारमध्ये पंतप्रधान मोदी बिहारमध्ये राष्ट्रीय मखाना बोर्डाचे उद्घाटन करतील आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवण्या साठी नवीन पूर्णिया विमानतळावर अंतरिम टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करतील. ते पूर्णिया येथे सुमारे ३६००० कोटी रुपयांच्या विविध वि कास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन देखील करणार आहेत.

Comments
Add Comment

“महायुतीचा धडाका: मुंबईत महापौर आमचाच!

विकासाच्या अजेंड्यावर जनतेची मोहोर मुंबईकरांनी अन्य ब्रँडला नाकारले - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे” ठाणे

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

मुंबईकरांच्या सेवेचे नवे पर्व

दोन्ही ठाकरेंपेक्षा एकट्या भाजपला अधिक जागा मुंबई - मुंबईत दोन्ही ठाकरेंच्या एकुण जागांपेक्षा एकट्या भाजपाला

BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी

मुंबई महापालिका निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी प्रभाग १ - रेखा राम यादव, शिवसेना प्रभाग २ - तेजस्वी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज