हाकेंनी जरांगेंसमोर मांडला ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव, म्हणाले...

"पाटील, ९६ कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले नाहीत, तर मग आपल्यात ११ विवाह जाहीर करू": लक्ष्मण हाकेंचा टोला


बीड: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा जाहीर सभेतून प्रस्ताव मांडला आहे. ते म्हणाले, "कुणबी प्रमाणपत्राद्वारे तुम्ही ओबीसीमध्ये आला आहात. तर आम्ही आमच्यातील क्वालिफाईड पोरं सुचवतो. आता पहिले ११ विवाह आप आपल्यामध्ये ठरवूयात, तुम्ही आमच्यात आले आहात, आता जात पात राहिली का? पाटील, ९६ कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले नाही तर मग आपल्यात ११ विवाह जाहीर करू" असे थेट आवाहन करत लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा जाहीर सभेतून प्रस्ताव दिला आहे.

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा कुणबी प्रमाणपत्राद्वारे ओबीसीत घुसखोरी करण्यासंदर्भात जाहीर सभेत खरमरीत समाचार घेतला. बीड दौऱ्यावर, गेवराईतील शृंगारवाडी येथे काल ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या आयोजनादरम्यान त्यांनी मनोज जरांगे पाटील यांवर निशाणा साधला.

हाके यांनी जरांगेंना डिवचले


तुम्ही आता आमच्यात आले ना तर अकरा विवाह तुमच्या आमच्यात करून त्या आधी जाहीर करा, हाके यांनी असे बोलत थेट जरांगेंना डिवचल्याचे दिसून आले. लग्न ठरवायची वेळ आली की आम्ही ९६ कुळी, मराठा, क्षत्रिय! आणि गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी मागासवर्गीय. हे मी बोललो नाही बरं का, ते हे स्वर्गीय एनडी पाटील बोलायचे. जात चोरांनो तुम्हाला मागासपणाचे डोहाळे लागले असल्याचे म्हणत हाके यांनी जरांगे पाटलांना लक्ष केले.

यावेळी बोलताना हाकेंनी थेट अजित पवारांनाच आव्हान दिल्याचे दिसून आले. अजित दादा मी गाजत वाजत बारामतीच्या पोलीस स्टेशनला येणार आहे. यावेळी त्यांनी मराठा आंदोलन मनोज जलांगे यांचा देखील समाचार घेतला.

पुढे बोलताना हाकेंनी आज बीड जिल्ह्यातील मराठा लोकप्रतिनिधींवरदेखील निशाणा साधल्याचे दिसून आले. गेवराईचा आमदार जातीवादी आहे. असे म्हणत त्यांनी चंदनचोर सोनवणे तुझं शिक्षण किती? असे म्हणत खासदारावरही टीका केली.

हाके यांच्या या जोरदार टिकेनंतर जरांगे पाटील त्यांना काय प्रतिक्रिया देतायत? यावर मराठा आणि ओबीसी यांच्यातील आरक्षण वाद अवलंबून असणार आहे.

 
Comments
Add Comment

‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

नाशिक : राज्‍य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्‍ती ‘महाराष्‍ट्र

“मोदी मिशन हे पुस्तक पुढच्या पिढीला प्रेरणा देणारं”, 'मोदीज् मिशन' मधील काही भाग पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

मुंबई :“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘मोदीज् मिशन’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि संग्रहित

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

पुण्याच्या NDA मध्ये गूढ! एकाच आठवड्यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू: नेमकं चाललंय तरी काय?

पुणे : पुण्यातील खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (NDA) पोहण्याचा सराव करत

मुंबई पोलिसांचा दाऊदच्या टोळीला मोठा झटका! ड्रग्सचा कारखाना सांगलीत तर मास्टरमाइंड दुबईतून पकडला

मुंबई : मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने (गुन्हे शाखेने) एक मोठे ड्रग्सचे आंतरराष्ट्रीय जाळे पकडून दाऊद