जागतिक प्रत्यारोपण क्रीडास्पर्धेत ईशान आणेकरचे घवघवीत यश

जलतरणात दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदकाची कमाई


ठाणे : अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती, दाते यांच्यासाठी होणार्या जागतिक प्रत्यारोपण क्रीडास्पर्धेत ठाण्यातील १३ वर्षीय ईशाने आणेकर याने नेत्रदिपक कामगिरी करत जलतरणात दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले आहे. भारतातील अवयव प्रत्यारोपण झालेला सर्वात लहान मुलगा असलेल्या ईशानने या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला य़श मिळवून दिले आहे.


जर्मनीतील ड्रेस्डेनमधे १७ ते २४ ऑगस्ट २०२५ दरम्यान झालेल्या वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स यास्पर्धेत भारताचे आणि महाराष्ट्राचे नाव उंचावणारा १३ वर्षीय ईशान आणेकर हा ठाण्यात राहतो. ईशानचे १० व्या वर्षी मुत्रपिंड प्रत्यारोपण (किडनी ट्रान्सप्लांट) झाले आहे. यानंतरही आपली जलतरणासाठीची आवड आणि जिद्द कायम ठेवत त्याने सराव केला. भारतातील सर्वात लहान वयाचा अवयव प्रत्यारोपण झालेला जलतरणपटू ठरलेल्या ईशानने जलतरण फ्रीस्टाईल प्रकारात १०० मीटर व २०० मीटर मधे सुवर्ण पदक आणि ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात रौप्य पदक fमळवले आहे.


ईशानचे वडील अनंत आणेकर यांनी त्याला मुत्रपिंड दान केले होते. यास्पर्धेत पात्र असल्याने त्यांनी ही भाग घेतला होता. त्यांना डार्टस आणि पेटांग या खेळात दोन रौप्य पदके मिळाली आहेत. यामुळे अणेकर कुटुंबाने एकत्रित ५ पदके पटकावली आहेत.


ईशान आणेकर सध्या हिरानंदानी फाउंडेशन स्कूलमधे नववीत शिक्षण घेत आहे. तीन वर्षापुर्वी त्याची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया लिलावाती रुग्णालयात डाँ उमा अली यांच्याकडे झाली होती. हिरानंदानी क्लब हाऊस येथे प्रशिक्षक पंकज राठोड यांच्या मार्गदर्शनात ईशान जलतरणाचा सराव करतो.


ईशानची जलतरणासाठीची आवड, जिद्द आणि त्यासाठी घेत असलेली मेहनत यामुळे त्याला आज आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळाले आहे असे सांगत ईशानची आई मानसी आणेकर यांनी डाँ उमा अली, आँर्गन इंडिया संस्था, शाळा आणि प्रशिक्षक यांच्या प्रोत्साहनानेच ईशानने हा टप्पा गाठला आहे अशी भावना व्यक्त केली आहे.


अवयवदानामुळे केवळ नवीन आयुष्यच मिळते अस नाही तर स्वप्नांनाही बळ मिळते याची प्रचिती ईशानच्या या नेत्रदिपक यशाने येते.



जागतिक प्रत्यारोपण क्रिडा स्पर्धेविषयी


अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती, अवयव दान करणारे दाते आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी दर दोन वर्षानी वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स ही आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येते. हे या स्पर्धेचे २५ वे वर्ष असून जर्मनीतील ड्रेस्डेन शहरात १७ ते २४ ऑगस्ट २०२५ दरम्यान झालेल्या स्पर्धेत ईशाने अणेकरने यश मिळविले आहे. अवयवदानाच्या माध्यमातून मिळालेल्या नव्या जीवनाचा उत्सव साजरा करणे, प्रत्यारोपणानंतरही खेळाच्या माध्यमातून निरोगी आयुष्य जगणे, जगभरातील प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबिय यांना एकत्र आणणे, यासह लोकांमध्ये अवयव दानासाठी जागरुकता निर्माण करणे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. आंतरराष्ट्रीय ॲालंfपक संघटनेची मान्यता प्राप्त असलेल्या या स्पर्धेत जगभरातील ६० हून अधिक देशातील १६०० स्पर्धक सहभागी झाले होते. धावणे, पोहणे, सायकलिंग यासह विविध खेळ प्रकारांचा यात समावेश असतो. भारतातून अवयव प्रत्यारोपण केलेले ४९ तर अवयव दान केलेल्या ८ स्पर्धकांनी भाग घेतला होता. भारताला या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एकूण १६ सुवर्ण, २२ रौप्य आfण २५ कांस्य अशी एकूण ६३ पदके fमळाली आहेत.

Comments
Add Comment

एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत रोहित शर्मा पहिल्या स्थानावर, विराट कोहलीने बाबरला टाकले मागे

दुबई : आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीने पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकले आहे. विराट ७२५

SA20 चा भारतात जलवा! 'इंडिया डे' कार्यक्रमात चाहत्यांचा तुफान उत्साह, चौथ्या सीझनसाठी लीग सज्ज

२६ डिसेंबर २०२५ ते २५ जानेवारी २०२६ दरम्यान रंगणार SA20 चा चौथा सीझन ग्रॅमी स्मिथ, फाफ डू प्लेसिस, मिलर यांची मुंबईत

एअर पिस्तूल स्पर्धेत भारताला अजिंक्यपद! २० वर्षीय नेमबाज राणा झाला 'सम्राट'

इजिप्त: कैरो येथे झालेल्या आयएसएसएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल गटात एकूण २४३.७ गुणांसह युवा

शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दक्षिण आफ्रिका विरोधात खेळण्यास सज्ज! ऐतिहासिक ईडन गार्डनवर होणार पहिला कसोटी सामना

कोलकता: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना १४ नोव्हेंबरपासून कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन

जागतिक नेमबाजी स्पर्धेत सम्राट राणाला सुवर्णपदक

कैरो : कर्नालचा युवा नेमबाज सम्राट राणा याने जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. सोमवारी,

भारत - द. आफ्रिका कसोटी मालिकेत आधी टी, मग लंच ब्रेक!

क्रिकेटची सुमारे १५० वर्षांची परंपरा मोडीत मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी