Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात 


मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे, मराठा आंदोलक जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आणखीन एक मागणी आता लवकरच पूर्ण केली जाणार आहे. आणि त्या हालचालींना सुरुवात देखील झाली आहे.


मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आझाद मैदानात आंदोलन केले होते. ज्यात त्यांना मोठं यश मिळालं.  यादरम्यान जरांगेंच्या अनेक मागण्या सरकारनी मान्य केल्या, तर काही मागण्यांसाठी वेळ मागितला होता. त्यानुसार सरकारने राज्यात हैदराबाद गॅझेट (Hyderabad gazette) लागू करण्याचा जीआर काढला. तर जरांगेंच्या उर्वरित मागण्यांमध्ये सातारा गॅझेट (Satara gazette) लागू करण्यासंदर्भात वेळ मागितला होता. दरम्यान आता सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे.


हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर, सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी पातळीवर हालचालींना सुरुवात झाली आहे. सातारा, औंध गॅझेटचा अहवाल पुढच्या आठवड्यात उपसमितीसमोर सादर होणार आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधा कृष्ण विखे पाटील यांनी पुणे विभागाकडून हा अहवाल मागवला आहे.



सातारा गॅझेटसाठी त्रिसदस्य समिती स्थापन


सातारा गॅझेटसाठी त्रिसदस्य समिती स्थापन केल्याची माहिती देखील समोर आली आहे, दरम्यान सातारा औंध गॅझेटचा फायदा हा पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना होणार असून, १३ ऑक्टोबर १९६७ पूर्वीच्या कुणबी नोंदी सापडल्या तर त्यांना दाखला देण्यास हरकत नसल्याचं सरकारी पातळीवर मत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांची ही मागणी देखील लवकरच मान्य होण्याची शक्यता आहे.



ओबीसी समाज चांगलाच आक्रमक


एकीकडे मराठा समाजाला सरकारच्या या हालचालीमुळे दिलासा मिळाला असला, तरी दुसरीकडे ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे, आज नागपुरात ओबीसी समाजाची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये येत्या सोमवारी सरकारच्या या निर्णयाविरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तसेच नागपुरात ओबीसी समाजाचा मोर्चा देखील निघणार आहे.



ओबीसी समाज न्यायालयात जाणार


मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण नको, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, अशी ओबीसी समाजाची मागणी आहे. त्यामुळे आता या जीआर विरोधात ओबीसी समाज न्यायालयात जाणार आहे. तिथे सरकार आपली बाजू कशी मांडणार? तसेच ओबीसी नेत्यांची कशी मनधरणी करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि

Amravati : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूची NHRCकडून स्वतःहून दखल; महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस

अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या देखभाल विभागात (SNCU) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा