बॅडमिंटनमध्ये २५ सेकंदांची ‘टाईम-क्लॉक’ प्रणाली लागू

नवी दिल्ली : बॅडमिंटन सामन्यांना अधिक वेग देण्यासाठी, खेळाची जागतिक नियामक संस्था ‘बीडब्ल्यूएफ’ने (बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन) ‘टाईम-क्लॉक’ प्रणालीची चाचणी घेण्यास मान्यता दिली आहे. या प्रणालीनुसार, एका रॅलीनंतर खेळाडूंना पुढील रॅलीसाठी २५ कंदांत तयार व्हावे लागेल. २० नोव्हेंबरपासून निवडक वर्ल्ड टूर स्पर्धांमध्ये या नियमाची अंमलबजावणी सुरू होईल.


हे नियम २०२६ पर्यंत सुरू राहतील आणि त्यांचा अधिक विस्तृतपणे वापर केला जाईल. ‘बीडब्ल्यूएफ’ने एका निवेदनात म्हटले आहे की, या नियमांमुळे ‘बीडब्ल्यूएफ’ला ‘टाईम-क्लॉक’ची चाचणी सुरू ठेवता येईल, ज्यात खेळाडूंना पुढील रॅलीसाठी २५ सेकंदांत तयार राहावे लागेल. या प्रणालीची चाचणी यशस्वी झाल्यानंतर राष्ट्रीय महासंघांना त्यांच्या खेळाडू, प्रशिक्षक आणि कर्मचार्यांसोबत अंतर्गत चाचणी घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच, स्टेकहोल्डर्सकडून अभिप्राय घेण्यासाठी एक ऑनलाईन सर्वेक्षणही सुरू करण्यात आले आहे.


डेटाचे विश्लेषण
‘बीडब्ल्यूएफ’ने अनेक सामन्यांच्या डेटाचे विश्लेषण केल्यानंतर हा २५ सेकंदांचा नियम निश्चित केला आहे. या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, सामन्यांमध्ये कमीत कमी व्यत्यय आल्यास, रॅलींमधील सरासरी वेळ २२ सेकंद असतो, तर एका रॅलीची सरासरी वेळ नऊ सेकंद असते. ‘बीडब्ल्यूएफ’चा विश्वास आहे की, २५ सेकंदांची ही मर्यादा खेळाडूंना पुरेसा आराम आणि खेळाचे सातत्य राखण्यासाठी योग्य संतुलन साधेल.


नियमांचे तपशील
२५ सेकंदांची मर्यादा : प्रत्येक रॅलीनंतर खेळाडूंना २५ सेकंदांचा अवधी दिला जाईल. ही वेळ पंचांनी स्कोअर अपडेट केल्यावर सुरू होईल.
सर्व्हर आणि रिसीव्हर : २५ सेकंदांच्या आत सर्व्हरने सर्व्हिससाठी तयार असणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे सर्व्हरने सर्व्हिससाठी स्थान घेतल्यावर रिसीव्हरनेही तयार असणे बंधनकारक आहे.
पंचांचे अधिकार : वैद्यकीय उपचार किंवा बॅडमिंटन कोर्टच्या देखभालीसारख्या विशेष परिस्थितीत पंचांना अधिक वेळ देण्याचा अधिकार असेल.
खेळाडूंचे स्वातंत्र्य : खेळाडूंना टॉवेल घेणे, पाणी पिणे किंवा स्वतःवर कोल्ड स्प्रे वापरणे यांसारखे सामान्य क्रियाकलाप करण्यासाठी पंचांची परवानगी घेण्याची गरज नाही, जोपर्यंत ते २५ सेकंदांच्या आत सर्व्हिस/रिसीव्ह करण्यासाठी तयार असतील.

Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या