TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं नाव अग्रेसर ठरतं. २००८ साली निर्माता असित मोदी यांनी सुरू केलेली ही मालिका तब्बल १७ वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आता या मालिकेने इतिहास रचत ४५०० भाग पूर्ण केले असून, भारतातील सर्वाधिक काळ चालणारी सिटकॉम मालिका बनली आहे.



‘तारक मेहता’ परिवारात जल्लोष


४५०० भाग पूर्ण केल्यानंतर या विशेष टप्प्याचा आनंद साजरा करण्यासाठी ‘तारक मेहता’ परिवार एकत्र आला. या सोहळ्यात लेखन, तांत्रिक विभाग, सेट डिझायनिंग आणि प्रोडक्शन स्टाफ अशा सर्व पाठीमागे काम करणाऱ्या सदस्यांचा गौरव करण्यात आला. जवळपास दोन दशकं या मालिकेची लोकप्रियता टिकवून ठेवणाऱ्या प्रत्येक हातामागे असलेलं श्रम आणि समर्पण याचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी निर्माता असित मोदी यांनी संपूर्ण टीमसोबत केक कापून आनंद व्यक्त केला.


असित मोदी म्हणाले, “ही यशोगाथा केवळ आमच्या टीमची नाही, तर सुरुवातीपासून आमच्यासोबत असलेल्या प्रत्येकाची आहे. खरी ताकद म्हणजे ते सर्व लोक, ज्यांच्या मेहनतीमुळेच हा शो इतका पुढे पोहोचला आहे. मी कलाकार, टीम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांचे आभार मानतो. त्यांच्या प्रेमामुळेच आम्ही इथवर आलो आहोत.”



गिनीज बुकमध्ये दोनदा नोंद


‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ने केवळ प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत, तर विक्रमांच्या पुस्तकातही आपली छाप सोडली आहे. या मालिकेचं नाव दोन वेळा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं गेलं आहे. २०२१ साली भारतातील सर्वाधिक काळ चालणा-या सिटकॉम मालिकेचा मान मिळाला, तर २ जुलै २०२२ रोजी मालिकेने ३५०० भाग पूर्ण करत आणखी एकदा गिनीज बुकमध्ये स्थान मिळवलं. यापूर्वी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही या मालिकेने आपली नोंद केली होती.


Comments
Add Comment

महात्मा गांधींच्या पणतीचे ग्लॅमरच्या जगात वेगळे स्थान!

महात्मा गांधी यांचे नाव संपूर्ण जग आदराने आणि श्रद्धेने लक्षात ठेवते. त्यांचे विचार, तत्त्वे आणि सत्य व अहिंसेचा

नांदेडच्या कैलास यांनी केबीसी १७ मध्ये जिंकले ५० लाख रुपये

कौन बनेगा करोडपती’ हा शो छोट्या पडद्यावरील सगळ्यात लोकप्रिय शो आहे. आजवर लाखो स्पर्धकांनी या शोमध्ये सहभागी होत

अॅक्शन चित्रपटाद्वारे हॉलिवूड डेब्यू करणार टायगर श्रॉफ

अभिनेता टायगर श्रॉफ लवकरच हॉलिवूड चित्रपटात दिसू शकतो. त्याचा पहिला चित्रपट एक जागतिक अॅक्शन थ्रिलर असेल. या

सुबोध भावे आणि मानसी नाईक जोडी प्रथमच एकत्र

सुबोध भावे आणि मानसी नाईक ही जोडी प्रथमच प्रेक्षकांसमोर आणणारा 'सकाळ तर होऊ द्या' या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज

अभिषेक-ऐश्वर्या यांचा युट्यूबविरुद्ध खटला

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी एआय-जनरेटेड डीपफेक व्हिडीओंबद्दल युट्यूब आणि गुगलविरुद्ध दिल्ली

'मनाचे श्लोक' टीमकडून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

सध्या महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे सोलापूर, बीड, धाराशिव जिल्ह्यांमध्ये