बीड : बीडच्या (Beed) अंबाजोगाईमध्ये (Ambajogai) पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पत्नी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कैलास सरवदे असे मृत्यू झालेल्या पतीचे नाव आहे. कैलास सरवदे याचे सात वर्षांपूर्वी माया नावाच्या महिलेशी लग्न झाले होते. मायाचे हे दुसरे लग्न होते. कैलास हा नेहमी दारु प्यायचा. त्यामुळे त्यांच्यात नेहमी वाद होत असायचे. अशाच वादातून मायाने कैलासला मारहाण केली, यामध्ये तो बेशुद्ध पडला. त्याला नातेवाईकांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर त्याचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.