तीनवेळा घसरल्यानंतर ऑटो Stocks सकाळी जबरदस्त उसळले 'या' कारणामुळे

मोहित सोमण:निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील कामगिरी सकाळच्या सत्रात महत्वाची राहिली. याचाच एक भाग म्हणून ऑटो समभागात (Stocks) मध्ये आज तीन दिवसांच्या नुकसानानंतर पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जीएसटी कपातीमुळे ऑटो शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यानंतर पुन्हा शेअर बाजारातील संरचना, जीएसटी कपातीतील संरचना (GST Reduction Restructuring), मायक्रो इकॉनॉमिक कारणांमुळे व नफा बुकिंगमुळे (Profit Booking) घसरलेले ऑटो शेअर आज पुन्हा एकदा उ सळले (Rebound) झाले आहेत. सकाळच्या सत्रातील सुरुवातीच्या कलातच ऑटो (१.२२%) इतक्या मोठ्या प्रमाणात उसळल्याने बाजारात रॅली झाली असून निफ्टी ऑटो पातळी २०५० पातळीवर व निफ्टी ४० पातळी २५०५० वर गेली.


सकाळी ११.१७ वाजेपर्यंत बीएसई ऑटो शेअर्समध्ये ०.८१% वाढ झाली असून पातळी ६०१९८.४० वर गेली. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील (Nifty Sectoral Indices) मधील निफ्टी ऑटो निर्देशांकात ०.८३% वाढ झाल्याने पातळी २६९६५.३० अंकावर स्थिरावली. सकाळच्या सत्रातील सुरुवातीच्याच कलात बीएसई मिडकॅप ०.२५% उसळला व बीएसई स्मॉलकॅप ०.२८% उसळला होता.सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ जेबीएम ऑटो, आयशर मोटर्स, टाटा मोटर्स, भारत फोर्ज, मारूती सुझुकी इंडिया, एक्साईड इंडस्ट्रीज, अशोक लेलँड, टीव्हीएस मोटर्स, एमआरएफ, भारत फोर्ज समभागात झाली आहे. याशिवाय तज्ञांनी ऑटो समभागातील खरेदी भविष्यात महत्वपूर्ण ठरू शकते असा दावा केल्याने गुंतवणूकदारांच्या भावना सकारात्मक झाल्या पर्यायाने आज ऑटोमोबाईल शेअर्स मध्ये वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता

मविआ घटक पक्षांना जास्त जागांची अपेक्षा भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांची

प्रकाश आंबेडकरांच्या तंबीनंतर काँग्रेस ताळ्यावर !

मुंबई : मी ज्या दिवशी तोंड उघडेन, त्यादिवशी काँग्रेसला महाराष्ट्रात नव्हे, तर देशभरात फटका बसेल, अशी तंबी प्रकाश

भाजप मुंबईत ३० टक्के नवे चेहरे देणार ?

मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मंजुरीनंतर ‘एबी’ फॉर्मचे वाटप होणार मुंबई : राजकारणात प्रयोगशील पक्ष अशी ओळख असलेली

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.