पूरग्रस्त पंजाबमध्ये ‘रिलायन्स’ची दहा सूत्री मदतयोजना

मुंबई : पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी रिलायन्सने येथे व्यापक दहा सूत्री मदतयोजना सुरू केली आहे. अमृतसर आणि सुलतानपूरमधील सर्वाधिक प्रभावित गावांमध्ये तातडीची मदत पोहोचवण्यासाठी 'रिलायन्सची मदत चमू कार्यरत आहे. अनेक कुटुंबांनी आपली घरे, उपजीविका गमावली आहे. रिलायन्स परिवार त्यांच्यासोबत आहे.अन्न, पाणी, माणसांबरोबरच प्राण्यांचीही काळजी घेतआहे,असे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक अनंत अंबानी, म्हंटले आहे.


दहा हजारहून अधिक कुटुंबांना आवश्यक अन्नधान्य वाटण्यात आले आहे. अत्यंत असुरक्षित अशा एक हजार कुटुंबांसाठी तसेच ,विधवा महिला किंवा ज्येष्ठ नागरिकांवर अवलंबून असलेल्या नेतृत्वाखालील कुटुंबांसाठी प्रत्येकी पाच हजार रूपयाचे व्हाउचर-आधारित सहाय्य केले जात आहे.सामुदायिक स्वयंपाकगृहांसाठी कोरड्या अन्नधान्याचा पुरवठा केला.पाणथळ भागांमध्ये सुरक्षित पिण्याचे पाणी पूरवण्यासाठी अस्थायी वॉटर फिल्टरची उभारणी केली.


निवऱ्यासाठी विस्थापित कुटुंबांचे संरक्षण करण्यासाठी ताडपत्री, ग्राउंडशीट्स, डासजाळी, दोऱ्या आणि बिछाना असलेली आपत्कालीन निवारा किट्स वाटली असून पूरानंतर होणाऱ्या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य-जागरुकता सत्रे आणि पाणी स्रोतांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. रिलायन्स फाउंडेशन आणि वनतारा आणि पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने औषधे, लसीकरण आणि तसेच पशुधन शिबिरे आयोजित करत आहेत आणि मृत प्राण्यांचे सन्मानपूर्वक वैज्ञानिक अंत्यसंस्कार करून संभाव्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधला जात आहे. रिलायन्सच मदत चमू जिल्हा प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आणि स्थानिक पंचायत यांच्या समन्वयाने तातडीची जीवनरक्षक मदत पोहोचवत आहे. ‘जिओ’च्या पंजाब टीमने एनडीआरएफच्या सहकार्याने पूरग्रस्त भागात नेटवर्क सुस्थापित करण्यासाठी प्रयत्न करून राज्यभर १००% विश्वासार्ह कनेक्टिव्हिटी केली असल्याचे अनंत अंबानी यांनी सांगितले.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे