HDFC ग्राहकांसाठी महत्वाची बातमी - ग्राहकांची १३ सप्टेंबरला गैरसोय होणार 'या' वेळात बंद राहतील नेट बँकिंग सेवा जाणून घ्या एका क्लिकवर

प्रतिनिधी:एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी पुढे आली आहे. १३ सप्टेंबरला बँकेच्या ग्राहकांना गैरसोय होऊ शकते. कारण बँकेच्या माहितीनुसार, १३ तारखेला रात्री १२.३० ते सकाळी ७.३० वाजेपर्यंत बँकेची युपीआय व नेट बँकिंग सेवा बंद राहणार आहे. बँकेच्या शेड्युल मेंटेनन्स कारणांमुळे ही सेवा बंद राहील.बँकेच्या माहितीनुसार, बँकेच्या यंत्रणेत सुधारणा, तसेच बँकेच्या तांत्रिक सिस्टीमचा वेग तपासण्यासाठी व इतर तांत्रिक देखभालीसाठी ही नेट बँकिंग सेवा बंद राहील, असे बँकेने सांगितले आहे. या सा त तासांत इंटरनेट बँकिंग सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे.


सेवा बंद पडल्यास उपाय काय?


एचडीएफसी बँकेने उपाय म्हणून या कालावधीत PayZapp Wallet वापरण्याचा सल्ला दिला आहे. ग्राहक या Wallet मध्ये आधीच फंड लोड करून ठेवू शकतात. याच कालावधीत अडीअडचणीला ही रक्कम ग्राहकांना सोयीस्कर ठरू शकते.


बँकेच्या माहितीनुसार, या कालावधीत बँलन्स चेक, युपीआय व्यवहार, क्यूआर पेमेंट, मर्चंट पेमेंट करणे शक्य होणार नाही. एटीएम व्यवस्थेत २०००० रूपयांपर्यंत व्यवहार शक्य होईल (Platinum, Millennia Debit Card)


इतर Times Points, Rupay Platinum, Rewards, Moneyback Debit Cards १०००० रूपयांपर्यंतच शक्य होईल. बँकेच्या माहितीनुसार केवळ आर्थिक व्यवहार नसलेल्या सेवा जसे की कार्ड ब्लॉक, पीन चेजिंग सुरू राहू शकते.


IMPS NEFT RTGS emandate सेवा मर्यादित!


IMPS Outward सेवा बंद राहील.


IMPS Inward सेवा मेंटेनन्स नंतरच (Credit) सेवा सुरू होणार


NEFT RTGS सेवा बंद राहील.


e- Mandate सेवा बंद राहील.


Term Loan Services -


सगळ्या टर्म लोन सेवा बंद राहतील.


WhatsApp Chat Banking -


WhatsApp Chatbanking सेवा - रजिस्ट्रेशन, क्रेडिट कार्ड सर्विसेस, लोन समरी, इन्स्टा/जंबो लोन माहिती चालू राहणार


अकाऊंट, ठेवी, चेक सेवा, प्रोफाईल अपडेट, डेबिट कार्ड व्यवहार बंद राहणार


Fastag -


टोल पेमेंट, रिचार्ज , क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड चालू राहणार ( इतर बँकांकडून)


एचडीएफसी बँकेच्या युपीआय / नेट बँकिंग द्वारे रिचार्ज, ऑटो रिचार्ज Standing Instruction मात्र बंद राहणार


SMS Toll Free Banking -


रजिस्ट्रेशन, क्रेडिट कार्ड समरी, रिवार्ड, टोल फ्री सपोर्ट सेवा ( क्रेडिट कार्ड चौकशीसाठी) या सेवा सुरू राहणार


Deposit, Balance Enquiry, mini statment, AePS व्यवहार बंद राहणार


NetBanking Mobile Banking -


खात्याचा बँलन्स, स्टेटमेंट, फंड ट्रान्स्फर, (IMPS NEFT RTGS Outward Payments) शक्य होणार नाही


प्रोफाईल रिलेटेड अपडेट शक्य होणार नाही.

Comments
Add Comment

Mockdrill In Navi Mumbai : नवी मुंबईत नागरी संरक्षण दलाचा भव्य 'मॉकड्रिल' सराव

नवी मुंबई : आपत्ती काळात नागरिकांचे संरक्षण आणि विविध यंत्रणांमधील समन्वय तपासण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या

Chandrashekhar Bawankule : अवैध मुरुम उत्खनन दोषी अधिकाऱ्यांचीनंतरच बडतर्फी

 सोलापूरमधील चिंचोली एमआयडीसीमधील प्रकार  महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आदेश  २०० कोटींच्या दंड

GI Tag White Onion Production : जीआय टॅग मिळूनही अडचण; पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात मोठी घट

रायगड : बदलत्या हवामानाचा मोठा फटका यंदा अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यावर्षी

Raigad News : रायगड जिल्ह्यात नियम पूर्तता करणाऱ्या दगडखाणींना उत्खननाची परवानगी: महसूल मंत्री

मुंबई :  आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या खाणींना सरसकट बंदी न घालता उत्खननासाठी परवानगी द्यावी, मात्र

Nashik MNC Forced Conversion Case : नाशिकमध्ये नामांकित कंपनीत तरुणींचा धर्मांतरासाठी छळ; नमाज आणि बीफ खाण्याचा दबाव

नाशिक : मंदिरांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. एका

Deputy Collectors : राज्यातील ५१ तहसीलदार होणार उपजिल्हाधिकारी

महसूल विभागात हालचाली; 'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संधी हुकणार? मुंबई :