अरेरे! इक्विटी म्युच्युअल फंडात ऑगस्ट महिन्यात घसरण !

प्रतिनिधी:असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया (AMFI) ने आपली नवी आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंड आवक (Inflow) घटली आहे. जु लै महिन्यात आवक ४२७०२ कोटी रूपये होती जी ऑगस्ट महिन्यात २२% घसरत ३३४३० कोटींवर पोहोचली आहे. इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) विचार केल्यास १३% घसरण ऑगस्टमध्ये झा ली. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात ही आवक ३८२३९ कोटी रुपयांवर गेली होती. असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, ऑगस्टपर्यंत सलग ५४ व्या महिन्यात म्युच्युअल फंड गुंतवणूकीत वाढ झाली आहे.


आकडेवारीनुसार मात्र व्यवस्थापना अंतर्गत मालमत्तेत (Asset Under Management AUM) मध्ये मात्र किरकोळ घसरण झाली. जूनमध्ये मालमत्ता अंतर्गत व्यवस्थापन ७५.१८ लाख कोटी झा ले असून जुलै महिन्यात ७५.३५ लाख कोटी झाले आहे. सेक्टोरल व थीमॅटिक म्युच्युअल फंडात समाधानकारक वाढ झाली. आकडेवारीनुसार, सर्वाधिक वाढ फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंडात झाली आहे ज्यात आवक ७ ६७९ कोटींवर पोहोचली आहे. ही सलग ११ व्या महिन्यातील वाढ आहे. सेक्टोरल व थीमॅटिक म्युच्युअल फंडात ३८९३ कोटी रुपयांवर वाढ झाली.


लार्जकॅप, मिडकॅप, स्मॉलकॅप महिन्यात जुलै महिन्यात अनुक्रमे २१२५.०९, ५१८२.४९, ६४८४.४३ कोटींनी वाढ झाली आहे. गोल्ड ईटीएफ (Gold Exchange Traded Fund ETF) गुंतवणूकीत जुलै महिन्यात १२०० कोटींनी वाढ झाली होती ती मागील महिन्यात तब्बल ७२०० कोटींनी वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

राज्यभर ईएसआयसी रुग्णालयांसाठी सरकारी जमिनी 'विनामूल्य'!

मुंबई : राज्यात उभारल्या जाणाऱ्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) रुग्णालयांसाठी सरकारी जमीन 'महसूल मुक्त'

दुबईत एअर शो दरम्यान LCA तेजस विमान कोसळले, विंग कमांडर नमांश स्यालचा मृत्यू

दुबई : दुबई एअर शो दरम्यान शुक्रवार २१ नोव्हेंबर २०२५ रोजी भारताचे एलसीए तेजस विमान कोसळले. या अपघातात विंग

टीम इंडियासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान

गुवाहाटी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना

IND vs BAN: भारताचा सुपर ओव्हरमध्ये पराभव, हिरो बनण्याच्या प्रयत्नात झिरो झाला कॅप्टन

दोहा : भारताचा (भारत अ) आशिया कप रायझिंग कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभव झाला. हा सामना जिंकून

कांदिवलीच्या चारकोप परिसरात बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार, चौघांना अटक

मुंबई : मुंबई, ठाणे, पुणे पट्ट्यात बांधकाम व्यवसायातून कोट्यवधींची नियमित उलाढाल होते. यामुळेच झटपट पैसा

मंत्री मंगलप्रभात लोढांना आमदार अस्लम शेखांनी दिली धमकी

मुंबई : मुंबईच्या सुरक्षेसंदर्भात सातत्याने रोहिंगे आणि घुसखोर बांग्लादेशींचा मुद्दा उचलून धरणारे मुंबई