शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला दिला पाठिंबा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव नगरसेवक निवडून आला असून या नगरसेवकानेही आता शिवसेनेला आपला पाठिंबा दर्शवला आहे. मालाडमधील राष्ट्रवादी काँग्रेस (शप) अजित रावराणे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळाला अधिक बळ प्राप्त झाले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन नगरसेवकांचाही शिवसेनेला पाठिंबा असून यासाठी सहयोगी गट बनवून अधिकृत पाठिंब्याची प्रक्रिया सुरु आहे . त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसांमध्येही ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे .


मुंबई महापालिकेत भाजपचे ८९ आणि शिवसेनेचे २९ अशाप्रकारे ११८ असे निम्म्यापेक्षा अधिक संख्या होत आहे. तर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ०३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एक अशाप्रकारे नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाच्या ३ नगरसेवकांचा पाठिंबा सहयोगी गटाच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न शिवसेनेच्यावतीने सुरु आहे. याबाबत दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरु आहे . मात्र, याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही . त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होवून हा पाठिंबा मिळाला जाईल असे बोलले जात आहे.


दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मालाडमधील एकमेव नगरसेवक असलेल्या अजित रावराणे यांनीही शिवसेनेला आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत आता नगरसेवक अजित रावराणे राहणार आहेत. याबाबत नगरसेवक अजित रावराणे यांनी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे . पण त्यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला नाही. मी शरद पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असून एकमेव नगरसेवक असल्यामुळे मी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. . विभागात विकास कामे करण्यासाठी विकास निधीची गरज असते आणि याचे आश्वासन शिवसेनेने दिल्यामुळे मी त्यांना पाठिंबा दिल्याचे रावराणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Azad Maidan Protest : आझाद मैदान वगळता मुंबईत सर्व ठिकाणी आंदोलनास बंदी

- गृह विभागाचे तातडीचे आदेश; मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी मुंबई : मराठा आंदोलक

Maharashtra Pollution Control Board : उद्योग क्षेत्रातील 'लायसन्स राज'ला लगाम

- प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमती शुल्कात कपात; ५ ते २५ वर्षांची रक्कम एकत्रित भरण्याची सोय मुंबई : राज्यातील

Devendra Fadnavis : सुट्या खाद्यतेल विक्रीबाबत 'एसओपी' तयार करा! मुख्यमंत्र्यांची 'एफडीए'ला सूचना

- छोट्या व्यापाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत मध्यम मार्ग काढण्याचे निर्देश मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Bhuleshwar : १५० मीटरवर मिरवणूक थांबली अन्...; 'भुलेश्वरचा राजा' प्रकरणात धक्कादायक गौप्यस्फोट

मुंबई : ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्ती दुर्घटनेच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. २२ फूट उंचीची भव्य

Mumbai Contractor Suicide : धक्कादायक! मुंबईत कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; थकीत बिलांमुळे मानसिक आणि आर्थिक तणाव?

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गजानन देवकाते नावाच्या कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटना

BMC Ganesh Utsav Guidelines : गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस प्रमाणपत्र’ अनिवार्य? मुंबई महापालिकेने स्पष्ट केली भूमिका