मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती जाहीर

पक्षाला यश मिळण्यासाठी एकनाथ शिंदेंनी कंबर कसली


मुंबई (प्रतिनिधी) : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने पक्षाची मुख्य कार्यकारी समिती तयार करण्यात आलेली आहे. यात पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासह २१ शिलेदारांचा समावेश करण्यात आला आहे. पुढील काही महिन्यांत मुंबईसह प्रमुख महापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. त्यात पक्षाला यश मिळावे यासाठी एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे.


अलीकडेच शिवसेनेने मुंबईतील विविध प्रभागातील प्रभारी विभाग प्रमुख व प्रभारी विधानसभा प्रमुखाच्या नियुक्त्या केल्या होत्या. मुंबई पालिकेत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी शिंदे प्रयत्नशील आहेत. ६० हून अधिक माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला असून काही दिवसांत आणखी माजी नगरसेवक प्रवेश करतील असा दावा नेते करत आहेत. पालिकेवर आतापर्यंत शिवसेनेची सत्ता राहिली आहे. पक्षातील फुटीनंतर पहिल्यांदाच पालिका निवडणुकीत ठाकरे व शिंदे हे दोन्ही गट आमने-सामने येणार आहेत.



अशी असेल शिवसेनेची ही मुख्य कार्यकारी समिती


१) एकनाथ शिंदे, मुख्य नेते २) रामदास कदम, नेते ३) गजानन कीर्तिकर, नेते ४) आनंदराव अडसूळ, नेते ५) मीनाताई कांबळे, नेत्या ६) डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार ७) रवींद्र वायकर, खासदार ८) मिलिंद देवरा, राज्यसभा - खासदार ९) राहुल शेवाळे, माजी खासदार १०) संजय निरुपम, माजी खासदार ११) प्रकाश सुर्वे, आमदार १२) अशोक पाटील, आमदार १३) मुरजी पटेल, आमदार १४) दिलीप लांडे, आमदार १५) तुकाराम काते, आमदार १६) मंगेश कुडाळकर, आमदार १७) श्रीमती मनीषा कायंदे, विधान परिषद, आमदार १८) सदा सरवणकर, माजी आमदार १९) यामिनी जाधव, माजी आमदार २०) दीपक सावंत, माजी आमदार २१) शिशिर शिंदे, माजी आमदार.

Comments
Add Comment

एमपीएससीच्या ९३८ पदांसाठी भरती जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षासाठी जाहिरात

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा