मुंबईतील हजारो इमारतींच्या भोगवटा प्रमाणपत्राबाबत मोठी घोषणा


मुंबई : राज्यात दिवाळीनंतर मुंबई ठाण्यासह अनेक महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच लाखो मुंबईकरांना दिलासा देणारा निर्णय झाला आहे. महानगरपालिका, नगर विकास विभाग, महसूल विभाग आणि सहकार विभाग यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने मुंबई महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार, म्हाडा, एसआरए आणि इतर प्राधिकरणांनुसार बांधकाम झालेले परंतु विविध कारणांमुळे भोगवटा प्रमाणपत्र (Occupation Certificate) न मिळालेल्या २५ हजारांहून अधिक इमारतींना आता भोगवटा प्रमाणपत्र देण्याबाबत धोरण तयार करण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.





लाखो मुंबईकर अनेक वर्षांपासून स्वतःच्या घरात राहूनही कायदेशीरदृष्ट्या "बिगरवासी" म्हणून राहत होते. त्याकाळच्या नियमांमधील पळवाटा किंवा विकासकांच्या चुका यामुळे हा प्रश्न निर्माण झाला होता. यासाठी नगर विकास विभाग २ ऑक्टोबरपासून एक नवे धोरण लागू करणार आहे. या धोरणाअंतर्गत बांधकामादरम्यान झालेल्या तांत्रिक किंवा प्रशासकीय चुका दूर करून इमारतींना सुटसुटीत पद्धतीने ओसी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे परवानगीच्या क्षेत्रफळातील फरक, सेटबॅकशी संबंधित अडचणीसारख्या कारणांमुळे ओसी रोखल्या गेलेल्या इमारतींनाही दिलासा मिळणार आहे. त्याचप्रमाणे, नियमावलीतील बदल, धोरणातील बदल यामुळे अडकलेल्या इमारतींनाही मोकळीक मिळेल. तसेच विकासकाकडून प्रशासनाला द्यावयाच्या जागा/फ्लॅट्स न दिल्यामुळे नागरिक अडचणीत असतील तरीही त्यांना ओसी मिळवण्याचा मार्ग उपलब्ध होणार आहे. पारदर्शक पध्दतीने ऑनलाइन ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.


भोगवटा प्रमाणपत्र मिळण्यासाठी सोसायटींनी पुढाकार घ्यावा. नव्या धोरणात सोसायटींनी एकत्र येऊन किंवा वैयक्तिकरीत्या प्रस्ताव दिल्यास पार्ट-ओसी मिळू शकेल. जर कोणत्याही इमारतीने पहिल्या सहा महिन्यांत ओसी किंवा पार्ट-ओसीसाठी अर्ज केला, तर त्यांना कोणताही दंड आकारला जाणार नाही. मात्र अतिरिक्त वापरलेला एफएसआय असल्यास त्यासाठी लागणारा प्रीमियम भरावा लागणार असल्याचे मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.


Comments
Add Comment

मुंबईतील कचरा खासगीकरणाच्या निविदेला विलंब

खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेच्या सफाई खात्याच्यावतीने कचरा उचलण्यासाठी वाहनांसह मनुष्यबळ

दुर्गंधी पसरत नाही की कचरा दिसत नाही, मुंबईतल्या अनोख्या कचरापेट्या

सचिन धानजी, मुंबई : मुंबईत आज कुणालाच आपल्या घरासमोर कचरा नको असतो. तसेच सार्वजनिक कचरा पेट्या असल्यास त्या

मुंबईत साथीच्या आजारांचे वाढले प्रमाण

मुंबई : गेल्या पंधरावड्यात साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात

'आपली एसटी' ॲपद्वारे कळणार लालपरीचा ठावठिकाणा - प्रताप सरनाईक

मुंबई : प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटीचा अचुक ठावठीकाणा काळावा

नवी मुंबई विमानतळामुळे महामार्गावर 'ट्रॅफिक कोंडी'चा धोका!

विमानतळासाठी वाहतूक 'वळवणार'; पाम बीच रोडवरील गर्दी टाळण्यासाठी 'सिक्रेट प्लॅन' लागू नवी मुंबई: नवी मुंबई

तब्बल १५ वर्षांपासून महिला होती त्रस्त, महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी कायमची केली त्रासातून मुक्तता ..

मुंबई (खास प्रतिनिधी) : रजोनिवृत्तीनंतरच्या रक्तस्त्रावाच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्य ६५ वर्षीय महिलेवर