करिष्माच्या मुलांनाही हवाय हिस्सा

संजय कपूरच्या हजारो कोटींच्या संपत्तीचा वाद आता कोर्टात


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रिया कपूरने संजय कपूर यांचे मृत्युपत्र नसल्याचा दावा केल्याचा आरोप मुलांनी केला आहे. त्यावेळी संजय कपूरची सर्व मालमत्ता आर. के. फॅमिली ट्रस्टच्या ताब्यात असल्याचं प्रियाने म्हटलं होतं. नंतर २१ मार्च २०२५ या तारखेला प्रियाने एक दस्तऐवज सादर केला, ते संजयचे मृत्युपत्र असल्याचा दावा प्रियाने केला, त्यामुळे ते बनावट असू शकतं, असा संशय मुलांनी व्यक्त केला आहे.


दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या तब्बल ३०,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेवरील वादात एक नवीन ट्विस्ट आला आहे. बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या संपत्तीतून वाटा मिळवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. करिश्मा ही संजय यांची दुसरी पत्नी होती. संजय व करिश्माला समायरा व कियान ही दोन अपत्ये आहेत.


मात्र संजय कपूर यांच्या संपत्तीत फक्त करिष्मा कपूर आणि तिच्या दोन मुलांचाच दावा नाहीये तर त्याच्या अनेकांची दावेदारी आहे. दरम्यान, करिष्माच्या मुलांनी त्यांची सावत्र आई म्हणजे संजय कपूरची तिसरी पत्नी प्रिया कपूरने संजय कपूरच्या मृत्यूपत्रात फेरफार करत संपूर्ण संपत्तीवर ताबा मिळवल्याचा आरोप केला आहे. याबाबत न्यायालयात दावा देखील ठोकण्यात आला आहे.


करिष्मा कपूरची मुलं अजून अल्पवयीन असल्यानं त्यांच्या वतीनं करिष्मा ही लीगल गार्डियन म्हणून त्यांचं प्रतिनिधित्व करणार आहे. या मुलांनी संपत्तीचं वाटप करण्यात यावं अशी मागणी केली आहे. संजय कपूरची संपत्ती ही ३० हजार कोटी रूपयांच्या घरात असल्याचं सांगण्यात येत आहे.
यामध्ये या मुलांना त्यांच्या वडिलांचे निधन होईपर्यंत त्यांच्या संपूर्ण संपत्तीची कोणतीही कल्पना नव्हती. त्यामुळं त्यांची किती संपत्ती होती याची माहिती मिळावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे. करिष्माच्या मुलांनी सांगितलं की जोपर्यंत त्यांचे वडील जिवंत होते तोपर्यंत त्यांचं त्यांच्या वडिलांसोबत जवळचं नातं होत. ते कायम वडिलांकडे सुट्टीसाठी जात होते. ते त्यांच्या वैयक्तीक आयुष्यात सहभागी होत होते.


प्रिया कपूरने संजय कपूर यांचे मृत्युपत्र नसल्याचा दावा केल्याचा आरोप मुलांनी केला आहे. त्यावेळी संजय कपूरची सर्व मालमत्ता आर.के. फॅमिली ट्रस्टच्या ताब्यात असल्याचं प्रियाने म्हटलं होतं. नंतर २१ मार्च २०२५ या तारखेला प्रियाने एक दस्तऐवज सादर केला, ते संजयचे मृत्युपत्र असल्याचा दावा प्रियाने केला, त्यामुळे ते बनावट असू शकतं, असा संशय मुलांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

‘व्ही. शांताराम’ यांचे जीवन मेगा बायोपिकच्या रूपात

भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी, नवे तत्त्वज्ञान आणि नवी सौंदर्यभाषा देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे

हास्याचा मनमुराद मेळ साधणारे ‘एकदा पाहावं करून’ लवकरच रंगभूमीवर!

मराठी रंगभूमीवर नातेसंबंधांची कडू-गोड बाजू आणि हलक्या-फुलक्या विनोदांचा सुंदर ताळमेळ साधणारे रत्नाकर मतकरी

महिला दिनी उलगडणार ‘तिघीं’च्या आयुष्यातलं ‘चौथं पान’!

सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ हा हृदयस्पर्शी आणि नात्यांच्या उबदार धाग्यांनी

आमिर खान प्रोडक्शन्सची सरप्राईज भेट! वीर दासचा ‘हॅपी पटेल’ १६ जानेवारी २०२६ ला प्रेक्षकांसमोर

‘हॅपी पटेल’चा धमाकेदार खुलासा! वीर दास आणि मोना सिंगची गुप्तहेर कथा १६ जानेवारी २०२६ रोजी रिलीज आमिर खानचा नवीन

कोण करणार मराठी बिग बॉस ६ सीझनला होस्ट? सलमान खानने दिली माहिती

मुंबई : हिंदी बिग बॉस संपण्याआधीच सलमान खानने मराठी बिग बॉसच्या सहाव्या सीझनला कोण होस्ट करणार याची माहिती दिली.

धर्मेंद्र यांना कसा दिला अंतिम निरोप ? कुठे आणि कसे झाले अस्थी विसर्जन ?

हरिद्वार : प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांना आता अंतिम निरोप देण्यात आला. कुटुंबियांच्या हस्ते धर्मेंद्र