अजितदादांना झालेय तरी काय? आजचे सर्व कार्यक्रम केले रद्द...

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार हे काल पक्षाच्या महत्वपूर्ण बैठकीत गैरहजर राहिले, त्यानंतर त्यांचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे, अजितदादांना नेमकं झालंय तरी काय असा प्रश्न प्रत्येकांना पडला आहे. अजित पवार यांचे एकामागून एक सर्व कार्यक्रम रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

काल, मंगळवारी रात्री वरळी डोम येथे पक्षाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पक्षाच्या आगामी रणनीती, संघटनात्मक बदल आणि स्थानिक निवडणुकांची तयारी यावर या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. पण इतक्या महत्वाच्या बैठकीत अजित पवार यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली. त्यानंतर आजही अजितदादांचे सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. अजित पवार आजारी असल्यामुळे बाहेरच्या कार्यक्रमांना उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, करमाळ्यातील महिला डीवायएसपी आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना अजित पवार यांनी थेट फोनवरून दम दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. ज्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांकडे या प्रकरणी नाराजी देखील व्यक्त केली होती.  या व्हिडिओमुळे सरकारची प्रतिमा मलिन झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे सरकारमध्ये अजितदादा एकटे पडले आहेत का? की अजून काही राजकीय कारण आहे? अशा अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मंत्री नितेश राणे, संग्राम जगताप, महेश लांडगे हे हिंदू नायक, त्यांनी पुढेही हिंदुत्वासाठीच काम केले पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप आणि महेश लांडगे हे तिघेही हिंदू नायक असून

AndheriNews : वीरा देसाई रोड, जे.पी, रोड, आझाद नगरमधील आता तुंबणार पाण्यातून होणार सुटका

मोगरा नाल्यातील प्रवाह आता वळवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड, जे.पी.रोड आणि आझाद

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय

Malad Accident : "तिला मला शेवटचं पाहायचं आहे..."; जखमी पतीने व्हीलचेअरवरून घेतले पत्नीचे अखेरचे दर्शन

मुंबई : मालाडमध्ये रविवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघाताने एका कुटुंबावर मोठा आघात केला. या अपघातात ३४

Western Railway New Timetable : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक लागू; जाणून घ्या नवीन बदल

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवांमध्ये १ सप्टेंबर

Kalwa Hospital News : कळवा रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ? संतापाची लाट; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

ठाणे : ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाला देण्यात आलेल्या जेवणात झुरळ आढळल्याचा