Amanta Healthcare शेअर सूचीबद्ध 'या' टक्क्यांनी सुसाट प्रिमियमसह सुरू

मोहित सोमण:अमानता हेल्थकेअर लिमिटेड (Amanta Healthcare Limited)शेअर आज १२.५०% प्रिमियम दराने शेअर बाजारात सूचीबद्ध (Listed) झालेला आहे. त्यामुळे शेअरची किंमत पहिल्या दिवशी १४१.७५ रूपये प्रति शेअरसह स्थिरावली आहे. सकाळच्या सत्रात सुरुवातीला कंपनीचा शेअर ७% हून अधिक प्रिमियम दरात सूचीबद्ध झाला होता. शेअरची इश्यू किंमत १२६ रू पये प्रति शेअरसह निश्चित करण्यात आली होती. एक कोटी इक्विटी शेअरसह १२६ कोटींचा आयपीओ (IPO) बाजारात दाखल झाला होता. १ ते ३ सप्टेंबर कालावधीत हा आयपीओ बाजारात दा खल झाला होता. कंपनीने आपल्या आयपीओसाठी १२० ते १२६ रूपये प्राईज बँड निश्चित केला होता.


कंपनीच्या आयपीओला सगळ्या श्रेणीतील गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. आयपीओपूर्वी कंपनीने ३७.८ कोटींची गुंतवणूक अँकर गुंतवणूकदारांकडून मिळवली होती. १९९४ मध्ये स्थापन झालेली अहमदाबाद-स्थित अमांता हेल्थकेअर ही कंपनी आयव्ही फ्लुइड्स, नेत्ररोग द्रावण (Ophthalmic Solution), डायल्युएंट्स आणि श्वसन काळजी उत्पादने यासारख्या निर्जं तुक द्रव फॉर्म्युलेशनमध्ये विशेषज्ञ आहे. कंपनी तिच्या वैद्यकीय उपकरण पोर्टफोलिओ अंतर्गत सिंचन द्रावण, प्रथमोपचार उत्पादने आणि डोळ्यांचे वंगण (Eye Lubricants) देखील तयार करते.

Comments
Add Comment

वायंगणी कांबळीवाडी समुद्रकिनारी कुजलेल्या अवस्थेत आढळला भला मोठा व्हेल मासा...

वेंगुर्ले: वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी कांबळीवाडी समुद्रकिनारी आज सकाळी भला मोठा व्हेल मासा कुजलेल्या

बंगळुरूतील धक्कादायक घटना, जोडप्याने भरधाव वेगाने पाठलाग केला आणि...

बंगळुरू : कर्नाटकमध्ये बंगळुरू येथे एक धक्कादायक घटना घडली. रस्त्यावरुन वेगाने जात असलेल्या एका कारला एका

सुरतहून साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर काळाचा घाला! तिघांचा मृत्यू तर चारजण जखमी

नाशिक: सुरतहून शिर्डीच्या साईबाबांचे दर्शना घेण्यासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला केला. काल मध्यरात्री

कलर्स मराठीच्या प्रेक्षकांना मिळणार नव्या मालिकेची मेजवानी! सुचित्रा बांदेकर, विनायक माळी घेऊन येत आहेत ‘मच्छीका पानी’

मुंबई: मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनात भर घालण्यासाठी मराठीतील दैनंदिन मालिका महत्त्वाची भूमिका निभावतात.

दिवाळी हंगामात लालपरीची ३०१ कोटींची कमाई

चांगले उत्पन्न आणल्याबद्दल मंत्री प्रताप सरनाईक यांच्यांकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक मुंबई : यावर्षी दिवाळी

सरकारी रुग्णालयात आता रोज वेगळ्या रंगांच्या चादरी

सुरक्षित उपचार, स्वच्छतेचा नवा आराखडा तयार मुंबई : राज्यातील सरकारी रुग्णालयात स्वच्छतेच्या दृष्टीने