टोयोटा किर्लोस्कर मोटरकडून वेईकल्‍सच्‍या किमतीमधील कपातीची घोषणा

मुंबई:टोयोटा किर्लोस्‍कर मोटर (TKM)ने आज सरकारच्या जीएसटी कपातीतील अनुषंगाने आपल्याही वाहनांच्या किंमतीत कफात जाहीर केली आहे. ग्राहकांना नुकतेच जाहीर करण्‍यात आलेल्या जीएसटी दरामधील कपातीच्या निर्णयाचा फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे कंपनीने सांगितले.सुधारित किमती २२ सप्‍टेंबर २०२५ पासून लागू होतील असे कंपनीने नुकतेच घोषित केले.


ही घोषणा करतानाच सेल्‍स-सर्विस-युज्‍ड कार बिझनेस अँड प्रॉफिट एन्‍हान्‍समेंटचे उपाध्‍यक्ष वरिंदर वाधवा म्‍हणाले आहेत की,'आम्‍ही या महत्त्वपूर्ण सुधारणेसाठी भारत सरकारचे मनापासून आभार व्‍यक्‍त करतो. यामुळे ग्राहकांसाठी किफायतशीरपणा मध्‍ये वाढ झाली असून ऑटो क्षेत्रात एकूणच आत्‍मविश्वास देखील वाढला आहे. सणासुदीच्‍या काळापूर्वी आम्‍हाला अपेक्षा आहे की हा पुढाकार उत्तम गतीसोबत मागणीला देखील आणखी चालना देईल.पारदर्शक व ग्राहक-केंद्रित कंपनी म्‍हणून आम्‍हाला ग्राहकांना हे फायदे देण्‍याचा आनंद होत आहे. आम्‍ही जागतिक दर्जाचे गतीशीलता सोल्‍यूशन्‍स अधिक सहजसाध्य करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत आणि अशा सुधारणांचे स्‍वागत करतो, जे मागणीला गती देतील, सर्वांसाठी गतीशीलता उपलब्‍ध करून देतील आणि ग्राहकांना आनंदित करतील, तसेच भारताच्‍या शाश्वत व सर्वसमावेशक विकासाप्रती योगदान देखील देतील.'


यापूर्वी सरकारने ऑटोमोबाईल क्षेत्रातील वाहनांवर जीएसटीत दरकपात घोषित केली आहे. त्यामुळे आता ठराविक दुचाकी, चारचाकी, प्रवासी वाहने, व्यवसायिक वाहने यांच्या जीएसटी स्लॅबमध्ये १२% वरून ५% वर कपात केली होती. तो फायदा कंपनी आ पल्या उत्पादनात परावर्तित करत असल्याने कंपनीने दरकपातीचा निर्णय आज जाहीर केला.


टोयोटाच्‍या वेईकल्‍समध्‍ये संभाव्‍य किंमत कपात पुढीलप्रमाणे:






















































मॉडेल किंमतीमध्‍ये कपात
ग्‍लाण्‍झा जवळपास ८५३०० रूपये
टायसर जवळपास ११११०० रूपये
रूमियन जवळपास ४८७०० रूपये
हायरायडर जवळपास ६५४०० रूपये
क्रिस्‍टा जवळपास १८०६०० रूपये
हायक्रॉस जवळपास ११५८०० रूपये
फॉर्च्‍युनर जवळपास ३४९००० रूपये
लीजेण्‍डर जवळपास ३३४००० रूपये
हायलक्‍स जवळपास २५२७०० रूपये
कॅमरी जवळपास १०१८०० रूपये
वेलफायर जवळपास २७८००० रूपये
Comments
Add Comment

मुंबई महापालिकेचे दवाखाने अष्टौप्रहर सुरु ठेवा; स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांचे निर्देश

मुंबई: मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने सुरु असलेले दवाखाने विशिष्ट वेळेतच सुरु असतात.

कमला मिलमध्ये महापालिकेची न भूतो, न भविष्यती कारवाई; डॉ अश्विनी जोशी यांनी अशक्य गोष्ट केली शक्य

मुंबई: मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी चाबूक हाती घेताच याच्या महसूल

Dabewala E-Bikes : डबेवाल्यांना लवकरच १०५ ई बाईक्स; महापौर रितू तावडे यांनी केली घोषणा!

मुंबईतील एक प्रवेशद्वार डबेवाला संकल्पनेवर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत प्रस्तावित प्रवेशद्वारांपैकी एक

Deccan Queen Railway Festival : प्रतिष्ठित 'डेक्कन क्वीन' रेल्वे महोत्सव होणार साजरा

मध्य रेल्वेचा मुंबई विभाग २७ मार्च २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे, गौरवशाली 'डेक्कन क्वीन

Iran-US-Israel War : कुवैत इंटरनॅशनल विमानतळावर ड्रोन हल्ला; इंधन टाकीला आग

आखाती देशाच्या उड्डाण मंत्रालयाने बुधवारी (२५ मार्च) दिलेल्या माहितीनुसार कुवेत इंटरनॅशनल विमानतळावर

धक्कादायक! मुलुंडमध्ये १६ वर्षीय मुलीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटकेत

मुंबई : मुलुंड परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. केवळ बोलणं बंद केल्याच्या रागातून एका