शेअर बाजारात जीएसटीतील कपातीमुळे तेजी...

तेजीचे कारण काय?
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या तब्बल साडेदहा तास सुरू राहिलेल्या बैठकीअंती राज्यांशी झालेल्या सहमतीतून, ५ टक्के आणि १८ टक्के अशा दोन स्तरीय जीएसटी दररचनेला मागील आठवड्यात मंजुरी देण्यात आली. म्हणजेच १२ टक्के आणि २८ टक्के हे कर दराचे टप्पे रद्दबातल करण्यात आले. सामान्य आणि मध्यमवर्गीयांच्या नित्य वापराच्या वस्तू, केश तेल, साबण, सायकलींवरील जीएसटी १२ तसेच १८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर येणार आहे. तर रोटी, पराठे आणि जीवनरक्षक औषधांवर शून्य जीएसटी आकारला जाणार आहे. गुंतागुंतीच्या वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) व्यवस्थेत संपूर्ण फेरबदल करण्यास मंजुरी दिल्यानंतर वैयक्तिक आरोग्य आणि आयुर्विम्यावरील कर आकारणी शून्यावर आणली आहे.
जीएसटी कौन्सिलने नुकत्याच घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसणार आहे. त्या दिवशी गिफ्ट निफ्टीमध्ये सुमारे १५७ अंकांनी (०.६३%) वाढ दिसून आली, ज्यामुळे आज शेअर बाजार मोठी वाढ नोंदवेल असे संकेत मिळत होतेच. या बदलांमुळे अनेक वस्तू आणि सेवा स्वस्त झाल्या आहेत, ज्यामुळे ग्राहकांची खरेदी वाढण्याची शक्यता आहे.
जीएसटी कौन्सिलने १२% आणि २८% चे स्लॅब रद्द करून त्यामधील बहुतेक वस्तू आणि सेवा अनुक्रमे ५% आणि १८% च्या स्लॅबमध्ये आणल्या आहेत. याचा सकारात्मक परिणाम विविध क्षेत्रांवर होईल.
१२००cc/१५००cc पेक्षा कमी असलेल्या छोट्या कार, इलेक्ट्रिक व्हेइकल्स (EV) आणि दुचाकी-तीनचाकी गाड्यांवरील जीएसटी २८% वरून १८% करण्यात आला आहे. यामुळे मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, हीरो मोटोकॉर्प आणि टीव्हीएस मोटर या कंपन्यांना मोठा फायदा होईल.
३५०cc पेक्षा कमी क्षमतेच्या बाइक्सवरील जीएसटीदेखील १८% करण्यात आल्याने बजाज ऑटो, हीरो मोटोकॉर्प आणि टीव्हीएस मोटरच्या शेअर्सची मागणी वाढेल.
एफएमसीजी (FMCG) सेक्टर :
दूध, चीज, बिस्किटे, चॉकलेट, सॉस, साबण, शॅम्पू आणि आईस्क्रीमवरचा जीएसटी १२% वरून ५% करण्यात आला आहे. यामुळे एचयूएल, नेस्ले, ब्रिटानिया, आयटीसी, डाबर, कोलगेट, मॅरिको आणि गोदरेज कंझ्युमर सारख्या कंपन्यांना फायदा होईल.
सिमेंट आणि इन्फ्रा :
सिमेंटवरील जीएसटी २८% वरून १८% केल्यामुळे अल्ट्राटेक, श्री सिमेंट, अंबुजा, एसीसी, दालमिया भारत आणि जेके सिमेंट या कंपन्यांसाठी सकारात्मक वातावरण निर्माण
झाले आहे.
कंझ्युमर ड्यूरेबल्स : एसी, टीव्ही आणि डिशवॉशरवरील जीएसटी २८% वरून १८% केल्यामुळे व्होल्टास, हॅवेल्स, व्हर्लपूल, ब्लू स्टार, अंबर आणि डिक्सनसारख्या कंपन्यांना लाभ होईल.
पेपर आणि पॅकेजिंग :
आता वह्या-पुस्तके करमुक्त झाली आहेत, तर कार्टन आणि पल्पवर फक्त ५% जीएसटी लागेल. यामुळे जेके पेपर आणि आयटीसी (पेपरबोर्ड) या कंपन्यांना फायदा होईल.
या व्यतिरिक्त खते, रिन्यूएबल एनर्जी, कापड आणि परिधान यांसारख्या क्षेत्रांना देखील जीएसटीतील कपातीमुळे मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. पुढील आठवड्याचा विचार करता निफ्टीची दिशा आणि गती तेजीची असून जोपर्यंत निफ्टी २४६२० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत निर्देशांकातील तेजी कायम राहील.


(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नाही)

Comments
Add Comment

उज्जीवन स्मॉल फायनान्सकडून धोरणात्मक विस्तार सुरु 'पर्यायी निधी उभारणी स्त्रोताचा आमच्या ग्राहकांवर परिणाम होणार नाही '.....

मोहित सोमण: आरबीआयच्या रिपोर्ट आकडेवारीचा विशेषतः आमच्या ग्राहकांच्या अनुषंगाने कुठलाही परिणाम होणार नाही असे

टोयोटा किर्लोस्कर मोटरकडून वेईकल्‍सच्‍या किमतीमधील कपातीची घोषणा

मुंबई:टोयोटा किर्लोस्‍कर मोटर (TKM)ने आज सरकारच्या जीएसटी कपातीतील अनुषंगाने आपल्याही वाहनांच्या किंमतीत कफात

'प्रहार' Stock Market विश्लेषण: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद ऑटो Stock जोरदार मात्र 'हा' धोका आजही परिणामकारक

मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांक अखेरीस किरकोळ वाढ आज बंद झाला. शेअर बाजारात आज शेवटच्या सत्रात वाढ

टाटा मोटर्स कमर्शियल व्हेइकलच्या ग्राहकांना संपूर्ण जीएसटी कमी केल्याचा लाभ मिळणार

मुंबई:भारतातील मोठ्या (कमर्शियल) वाहन उत्पादक कंपन्यापैकी एक असलेल्या टाटा मोटर्सने आपल्या संपूर्ण व्यवसायिक

सावधान ! Linkedin वर नोकरी शोधताय मग या गोष्टी जरुर करा !

नोकरी घोटाळ्यांमध्ये वाढ रोखण्यासाठी लिंक्डइनने नवीन पडताळणी वैशिष्ट्ये सादर केली मुंबई:भारतातील रोजगार

IPhone 17 Series launch : फक्त काही तास! आयफोन १७ लाँच ईव्हेंटसाठी उत्सुकता शिगेला, १७ मध्ये बरंच काही नवीन... कुठे पाहाल लाईव्ह इव्हेंट? जाणून घ्या

मुंबई : आयफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. २०२५ मधील सर्वात मोठा स्मार्टफोन लाँच ईव्हेंट उद्या, ९ सप्टेंबर