Punjab News : रावी, सतलज आणि चिनाब नद्यांचं रौद्ररूप! ४ कोटी लोकांवर जीवघेणं संकट, ५६ जणांचा बळी...

अमृतसर : पाकिस्तानमधील रावी, सतलज आणि चिनाब या नद्यांना आलेल्या पुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या पुराचा २५ जिल्ह्यातील तब्बल ४,१०० हून अधिक गावांना फटका बसला आहे. २६ ऑगस्टपासून आतापर्यंत पंजाब प्रांतात सुमारे ५६ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो कुटुंबे बेघर झाली आहेत. अनेक नागरिक बेपत्ता असून त्यांचा शोध अजूनही सुरू आहे. या संकटावर मात करण्यासाठी प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (PDMA) मदत छावण्यांची उभारणी केली असून वैद्यकीय सेवांसाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती महासंचालक इरफान अली काठिया यांनी दिली.



५६ जणांचा मृत्यू


पाकिस्तानात नद्यांना आलेल्या भीषण पुरामुळे हाहाकार माजला आहे. आतापर्यंत २५ जिल्ह्यांतील ४,१०० पेक्षा जास्त गावे जलमय झाली असून पंजाब प्रांतात किमान ५६ जणांचा बळी गेला आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या आपत्तीमध्ये शेकडो नागरिक बेघर झाले असून काहीजण अजूनही बेपत्ता आहेत. पुरात वाहून गेलेल्यांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांचे प्रयत्न सुरू आहेत. प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (PDMA) महासंचालक इरफान अली काठिया यांनी सांगितले की, या पुरामुळे तब्बल ४.१ कोटी लोकांवर परिणाम झाला आहे. मोठ्या प्रमाणावर झालेल्या विस्थापनाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने ४२५ मदत छावण्या व तंबू नगरी उभारली असून, येथे नागरिकांना अन्न व तात्पुरते निवास दिले जात आहे.



पाकिस्तानात वैद्यकीय छावण्यांची धावपळ; १,७५,००० रुग्णांवर उपचार


पाकिस्तानातील पूरग्रस्त भागांमध्ये वैद्यकीय मदतीची मोठी चळवळ उभारण्यात आली आहे. ‘डॉन’ वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ५०० हून अधिक वैद्यकीय छावण्या सध्या कार्यरत असून येथे जखमी, संसर्गजन्य आणि जलजन्य आजारांनी त्रस्त असलेल्या तब्बल १.७५ लाख रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. बचाव कार्यामध्ये आतापर्यंत २ कोटीहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. दरम्यान, प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (PDMA) महासंचालक इरफान अली काठिया यांनी सांगितले की, पंजाबच्या कृषी क्षेत्रातील उपजीविकेचे रक्षण करण्यासाठी १.५कोटीहून अधिक जनावरे देखील सुरक्षित ठिकाणी हलवली गेली आहेत.



पाकिस्तानात ९०० मृत्यू; १,००० हून अधिक जखमी


पंजाबमधील पूरस्थिती अजूनही गंभीर असून प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (PDMA) दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यातील ४२ लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. रावी, सतलज आणि चिनाब नद्यांच्या काठावरील ४१००हून अधिक गावे पाण्याखाली गेली आहेत. मुल्तानचे उपायुक्त वसीम हामिद सिंधू यांनी सांगितले की, हेड त्रिमू भागातून येणाऱ्या संभाव्य पूराच्या धोक्याला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विस्तृत कार्ययोजना तयार केली आहे. दरम्यान, चिनाब नदीवरील हेड मुहम्मदवाला आणि शेरशाह बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी होऊ लागल्याने दबाव थोडासा हलका झाला आहे. तथापि, नव्या पाण्याच्या प्रवाहामुळे नदीची पातळी पुन्हा वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी नाकारलेली नाही. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (NDMA) आकडेवारीनुसार, २६ जूनपासून सुरु झालेल्या मान्सून पावसात आणि पुरात पाकिस्तानभरात ९०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून १,००० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत.

Comments
Add Comment

Rajnath Singh : "पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिलं तर..."; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या भडकाऊ वक्तव्याला जोरदार

Sabarimala Temple Case : सबरीमला मंदिर प्रवेश प्रकरणात केंद्र सरकारने मांडली स्पष्ट भूमिका; म्हणाले...

केरळमधील सबरीमला मंदिराबाबत (Sabarimala Temple Case) केंद्र सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका मांडली. केंद्र

Lashkar-e-Taiba : श्रीनगर पोलिसांची मोठी कारवाई; पोलिसांकडून लष्कर-ए-तैयबा नेटवर्कचा भंडाफोड

- दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांसह पाच जणांना अटक श्रीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी

Air India: एअर इंडियाचा प्रवास ८ एप्रिलपासून महाग होणार; जाणून घ्या किती खर्च येणार?

नवी दिल्ली: टाटा ग्रुपच्या मालकीच्या एअर इंडियाने प्रवाशांना मोठा धक्का दिला आहे. जर तुम्हीही एअर इंडियाने

Kashi Vishwanath Vedic Clock : टिक-टिक नव्हे, आता मुहूर्तात वेळ! काशीत ‘वैदिक घड्याळ’ची एंट्री!

वाराणसी : उत्तर प्रदेशातील जगप्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिर (Kashi Vishwnath Temple) आता केवळ अध्यात्माचेच नव्हे, तर भारताच्या

Ramdas Athawale: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार पदाची केली हॅट्ट्रिक

मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची तिस-यांदा