कल्याणमधील रामदेव हॉटेलचा हलगर्जीपणा, फ्राईड राईसमध्ये आढळले झुरळ!

कल्याण: कल्याणमधील रामदेव या नामांकित शाकाहारी हॉटेलसंबंधित एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हॉटेलच्या फ्राइड राईसमध्ये झुरळ आढळल्याचा आरोप एका ग्राहकाने केला आहे. मुळात हे हॉटेल कल्याण शहरातील जूने आणि प्रचलित हॉटेल असल्याकारणांमुळे ही बातमी अनेकांसाठी धक्का देणारी ठरत आहे. 


याच हॉटेलमध्ये काही दिवसांपूर्वी एका ग्राहकाच्या जेवणामध्ये लोखंडाचा तुकडा आढळल्याची घटना घडली होती, हे प्रकरण ताजे असतानाच, आता पुन्हा एकदा रामदेव हॉटेलमधील फ्राईड राईसमध्ये झुरळ आढळल्याची घटना घडली आहे. ज्यामुळे ग्राहकांकडून या घटनेचा संताप व्यक्त केला जात आहे.



पार्सल फ्राईड राईसमध्ये झुरळ


निकिता जाधव या कल्याणच्या रामदेव हॉटेलमध्ये पार्सल घ्यायला गेल्या होत्या. त्यांनी फ्राईड राईस मागवला असता त्यामध्ये झुरळ आढळले. धक्कादायक बाब म्हणजे तो फ्राईड राईस त्यांच्या मुलांनी खाल्ला आहे. मुलांना फ्रुड पॉइझन झाले तर याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली आहे. सलग घडणाऱ्या घटनांमुळे रामदेव हॉटेलच्या स्वच्छता व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

Comments
Add Comment

ठाणे रुग्णालयाच्या पाडकामात आढळली शेकडो वर्षे दडलेली शिल्पकला

कोरीव प्रतिमा असलेल्या प्राचीन शिल्पांनी सर्वसामान्यांत उत्सुकता ठाणे : इतिहासाच्या पाऊलखुणा आजही जुन्या

बदलापूर काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

बदलापूर  : ''माझ्या नेत्याला जर कोणत्या पदावरून राजीनामा द्यावा लागत असेल, तर त्यांच्या सन्मानार्थ मीसुद्धा

ये पब्लिक है, सब जानती है!

केडीएमसीच्या महापौरपदावर खा. श्रीकांत शिंदे यांचे उत्तर कल्याण  : ''ये पब्लिक है, सब जानती है. कुणीही काहीही बोलो,

ठाणे-बोरिवली भूमिगत रस्त्याच्या कामासाठी सहा महिने वाहतुकीत बदल

ठाणे : ठाणे-बोरिवली दुहेरी भुयारी मार्गाच्या निर्माणाचे काम सध्या घोडबंदर येथील मुल्लाबाग भागात सुरू झाले आहे.

मिरा-भाईंदर महापालिकेचे इलेक्शन गणित ठरले! ९५ पैकी ४८ जागांवर महिलांना संधी

ओबीसीच्या २५ जागा; 'या' प्रभागांत दोन महिला नगरसेविका निवडल्या जाणार भाईंदर: मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आगामी

नवी मुंबईच्या निवडणुकीसाठी 'सीट फिक्स'! १११ पैकी ५६ जागांवर महिलांचे वर्चस्व

SC साठी ५, ST साठी १ जागा महिलांसाठी राखीव; इच्छुकांचे धाबे दणाणले! नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या (NMMC) आगामी